Marathi News » Photo gallery » Holi 2021 celebration marathi celebrity couple celebrating their first holi as husband and wife
Holi 2021 | मराठी कलाकारांवरही चढलाय होळीचा रंग, ‘या’ जोड्या साजरी करणार लग्नानंतरची पहिली होळी!
मराठी मनोरंजन विश्वातल्या काही सेलिब्रेटींसाठी मात्र यंदाची होळी खूपच खास असणार आहे. यावर्षाच्या सुरुवातीलाच काही मराठी सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. आपल्या जोडीदारासोबत यावर्षी पहिल्यांदाच ते होळीचा सण साजरा करणार आहेत.
आज सगळीकडे रंगपंचमीचं रंगीबेरंगी (Holi 2021 Celebration) वातावरण आहे. होळीच्या रंगांचा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसू लागला आहे. कोरोनामुळे या उत्सवावर काहीशा मर्यादा आल्या आहेत, मात्र कोणाचाही उत्साह कमी झालेला नाही. मराठी मनोरंजन विश्वातल्या काही सेलिब्रेटींसाठी मात्र यंदाची होळी खूपच खास असणार आहे. यावर्षाच्या सुरुवातीलाच काही मराठी सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. आपल्या जोडीदारासोबत यावर्षी पहिल्यांदाच ते होळीचा सण साजरा करणार आहेत.
1 / 6
स्वप्नाली-आस्ताद काळे : अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. पती-पत्नी म्हणून दोघांची ही पहिलीच होळी आहे.
2 / 6
मिताली-सिद्धार्थ चांदेकर : मनोरंजन विश्वातलं क्यूट कपल अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नवीन वर्षाच्या सुरुवातीस लग्नाच्या बेडीत अडकले. ही जोडी लग्नाअगोदर दोन वर्षं रिलेशनशीपमध्ये असली, तरी लग्नानंतर त्यांची ही पहिलीच एकत्र होळी असणार आहे.
3 / 6
मानसी-प्रदीप खरेरा : मागील वर्षी मानसी आणि तिचा प्रियकर प्रदीपने साखरपुडा केला होता. या वर्षाच्या सुरुवातीलाच ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. मानसीच्या यंदाच्या होळीला पती प्रदीपमुळे हरियाणवी टचही मिळणार आहे.
4 / 6
अभिज्ञा-मेहुल पै : प्रसिध्द अभिनेत्री अभिज्ञा भावेने 6 जानेवारी रोजी प्रियकर मेहूल पैसोबत लग्नगाठ बांधली. अभिज्ञाचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. पती मेहूलसोबत अभिज्ञाची ही पहिलीच होळी असणार आहे.
5 / 6
श्रद्धा-संग्राम समेळ : अभिनेता संग्राम समेळने श्रद्धा फाटक हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. श्रद्धा ही एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. संग्राम आणि श्रद्धाचा हा विवाह सोहळा काही खास नातेवाईक आणि कुटुंबाच्या उपस्थितीत इचलकरंजी याठिकाणी पार पडला. या जोडीचीही यंदाची पहिली होळी आहे.