AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची तुळस वारंवार सुकतेय? मग आजच कुंडीत एक चमचा…

तुमची लाडकी तुळस सुकत आहे का? कुंडीतील माती, पाणी आणि कीड यांवर नियंत्रण मिळवून तुळशीचे रोप पुन्हा हिरवेगार कसे करावे, याचे सोपे घरगुती उपाय या लेखात वाचा.

| Updated on: Apr 23, 2026 | 2:58 PM
Share
भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक हिंदू घराच्या अंगणात किंवा गॅलरीत तुळशीचे रोप असतेच. मात्र, अनेकदा काळजी घेऊनही तुळस सुकू लागते, पाने पिवळी पडतात किंवा त्यावर पांढरी जाळी येते.

1 / 6
कृषी तज्ज्ञांच्या मते, तुळस सुकण्यामागे प्रामुख्याने चार कारणे असतात. कुंडीत गरजेपेक्षा जास्त पाणी साचणे, झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे,  हवेतील अति ओलावा किंवा खेळत्या हवेचा अभाव, मावा आणि कोळी यांसारख्या कीटकांमुळे होणारा संसर्ग यामुळे तुळस सुकते.

2 / 6
जर तुमच्या तुळशीची पाने पिवळी पडत असतील किंवा त्यावर पांढरी जाळी दिसत असेल, तर महागडी औषधे आणण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातील काही गोष्टी वापरून आपण हे रोप पुन्हा हिरवेगार करू शकतो.

3 / 6
जर पानांवर बारीक कीड दिसत असेल, तर कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड करा आणि झाडावर फवारा. हे नैसर्गिक कीटकनाशक झाडाला कोणतीही इजा न पोहोचवता कीड नष्ट करते. हळद ही अँटी-बॅक्टेरियल असते. कुंडीतील मातीत बुरशी लागू नये म्हणून दर पंधरा दिवसांनी थोडी हळद मातीत मिसळावी. यामुळे झाडाची मुळे मजबूत होतात.

4 / 6
जर कीड जास्त प्रमाणात असेल तर लसूण आणि हिरवी मिरची वाटून त्याचे गाळलेले पाणी झाडावर फवारावे. याच्या वासामुळे कीटक लगेच पळून जातात. जुन्या काळापासून तुळशीवर लाकडाची राख शिंपडण्याची पद्धत आहे. राख केवळ कीड दूर ठेवत नाही, तर मातीतील ओलावा संतुलित राखण्यासही मदत करते.

5 / 6
रोपाची कीड गेल्यानंतर त्याला ताकद मिळण्यासाठी थोडे शेणखत किंवा गांडूळ खत द्यावे. तुळशीला दिवसातून किमान ४ ते ५ तास कोवळे ऊन मिळेल याची काळजी घ्यावी. तसेच, कुंडीतील माती वरून कोरडी झाल्याशिवाय पुन्हा पाणी देऊ नये. या छोट्या बदलांमुळे तुमची तुळस वर्षभर टवटवीत आणि सुगंधित राहील.

6 / 6
Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग

न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी