AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावात 70 टक्के महिला तरुण वयात होतात विधवा, या कारणामुळे होतो नवऱ्याचा मृत्यू, ऐकून बसेल धक्का

भारतातील असं एक गाव जिथे 70 टक्के महिला तरुण वयातच विधवा होतात. या गावातील बहुतांश पुरुष अल्पवयातच मृत्यूमुखी पडतात. कारण ऐकून देखील तुम्हाला बसेल धक्का.

| Updated on: May 12, 2026 | 12:51 PM
Share
भारतामध्ये अनेक गावं त्यांच्या परंपरा, संस्कृती किंवा इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत. मात्र राजस्थानमधील एक गाव अशा कारणासाठी ओळखलं जातं, ज्यामागची सत्यकथा अत्यंत वेदनादायी आहे. राजस्थानच्या बूंदी जिल्हा परिसरातील बुढपूरा गाव आजही 'विधवांचं गाव' म्हणून ओळखलं जातं. हे नाव ऐकून धक्का बसतो, पण यामागचं वास्तव अधिक भयावह आहे.

1 / 6
या गावातील बहुतांश पुरुष अल्पवयातच मृत्यूमुखी पडतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे ‘सिलिकोसिस’ हा जीवघेणा फुफ्फुसांचा आजार. गावाजवळील सॅंडस्टोन खाणींमध्ये काम करताना उडणाऱ्या धुळीमुळे हा आजार होतो आणि हळूहळू तो कामगारांच्या जीवावर बेततो.

2 / 6
बुढपूरा गावाबद्दल एक कटू सत्य सांगितलं जातं. 'या गावातील पुरुष कधीच म्हातारे होत नाहीत.' कारण तरुण वयातच त्यांचा मृत्यू होतो. गावातील 35 वर्षांवरील जवळपास 70 टक्के महिला विधवा असल्याचं सांगितलं जातं. अनेक घरांमध्ये कर्ता पुरुष नसल्याने महिलांवरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येते.

3 / 6
सवाई मानसिंह मेडिकल कॉलेज येथील डॉक्टरांच्या माहितीनुसार, दररोज 50 ते 60 रुग्ण श्वसनाच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात दाखल होतात. त्यापैकी जवळपास निम्मे रुग्ण सिलिकोसिसग्रस्त असतात. बहुतेक वेळा रुग्ण उशिरा उपचारासाठी येतात आणि तोपर्यंत आजार गंभीर टप्प्यावर पोहोचलेला असतो.

4 / 6
घरातील कमावता पुरुष मृत्यूमुखी पडल्यानंतर महिलांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे अनेक महिलांना त्याच खाणींमध्ये काम करण्याशिवाय पर्याय राहत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या दगड फोडण्याचं काम करतात.

5 / 6
त्यांना माहीत असतं की याच कामामुळे त्यांच्या पतीचा मृत्यू झाला, पण गरीबी आणि बेरोजगारीमुळे त्यांच्याकडे दुसरा मार्ग नसतो. या कामासाठी त्यांना दिवसाला केवळ 300 ते 400 रुपये मजुरी मिळते आणि त्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

6 / 6
Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह