Kiara Advani | ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसला किआरा अडवाणीचा जलवा, फोटो पाहून चाहते म्हणाले..
Kiara Advani Photos : बॉलीवूड अभिनेत्री किआरा अडवाणीने तिच्या सौंदर्यने पुन्हा चाहत्यांच्या हृदयात जागा मिळवली आहे. तिने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

- बॉलीवूड अभिनेत्री किआरा अडवाणी हिचे नाव मोठ्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट झाले आहे. तिच्या वेगवेगळ्या अदांनी ती सतत चाहत्यांचे मन जिंकत असते. ती नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. (Photos : kiaraaliaadvani/Insta)
- या फोटोमध्ये किआराने ऑफ शोल्डर लॉन्ग ट्यूब गाऊन घातलेला दिसत आहे. या आउटफिटमध्ये सगळे रंग आहेत. त्यामध्ये तिची टोन्ड फिगरही दिसत आहे.
- तिचा सुंदर आऊटफिट फ्लॉन्ट करत किआराने वेगवेगळ्या पोझेस दिल्या आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आणि कमेंट्स करत तिचे कौतुकही केले.
- किआरा आता ‘डॉन’च्या पुढल्या पार्टमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरू होणार आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत झळकणार असल्याचे समजते.




