AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किंग खान पोहोचला लालबागच्या राजाच्या दरबारात; शाहरुखचा खास अंदाज चर्चेत

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे यंदाही किंग खान गणपती बाप्पाच्या आशीर्वादासाठी मुंबईत आला होता. निळ्या कुर्त्यातील शाहरुखचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यात चाहते त्याची एक झलक टिपण्यासाठी धडपडत होते.

| Updated on: Sep 21, 2026 | 9:36 PM
Share
सध्या मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम असून मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात. अनेक सेलिब्रिटीही गणरायाचे दर्शन, आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात.  ( Photos : Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)

1 / 6
गणेशोत्सव सुरू झाल्यापासून रणवीर सिंग, शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी, रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा तसेच रोहित शर्मा यांसारख्या कलाकारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. तर आज बॉलिवूडचा किंग खान , शाहरुख खान  हाही सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आला होता.

2 / 6
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमी चर्चेत असतो. सध्या बऱ्याच काळात तो मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. मात्र चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पहात आहेत. दरवर्षी तो गणरायाच्या दर्शनाला येतो. आजही तो पत्नी, मुलगी यांच्यासह लालबाग येथे आला. किंग खानला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, अनेक जण त्याची एक छबी मोबाईलमध्ये टिपण्यस धडपडत होते.

3 / 6
निळ्या रंगाचा कुर्ता, हातात घड्याळ,  कपाळावर लावलेला टिळा अशा वेशात सुहास्य वदनाने शाहरुख गणारायाच्या दर्शनासाठी आला.

निळ्या रंगाचा कुर्ता, हातात घड्याळ, कपाळावर लावलेला टिळा अशा वेशात सुहास्य वदनाने शाहरुख गणारायाच्या दर्शनासाठी आला.

4 / 6
त्याच्यासोबत पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी हेही लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. यावेळी शाहरुख खान याला बाप्पाचा फोटो देखील भेट देण्यात आला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

5 / 6
शाहरुख खानचा  आगामी 'किंग' (King) हा चित्रपट 24 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याची मुलगी सुहानाही झळकणार आहे. शाहरुखला मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

6 / 6
Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...