फक्त 60 रुपयांत LIC ची विमा पॉलिसी काढा, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना आधार

LIC insurance policy | या पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिट देखील दिला जातो. जर पॉलिसीधारक अकाली मरण पावला किंवा अपघातामुळे अपंगत्व आले तर एलआयसी त्याच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देते.

1/5
एलआयसीची न्यू जीवन मंगल पॉलिसी ही मायक्रो इन्शुरन्स टर्म स्कीम आहे. यामध्ये पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रिमीयमची रक्कम परत केली जाते. ही पॉलिसी फक्त 60 रुपयांच्या परवडणाऱ्या प्रीमियमवर मिळू शकते. या पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिट देखील दिला जातो. जर पॉलिसीधारक अकाली मरण पावला किंवा अपघातामुळे अपंगत्व आले तर एलआयसी त्याच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देते.

2/5
या पॉलिसीमध्ये अपघाती मृत्यू कवच परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. काही पैसे देऊन एखादी व्यक्ती मोठ्या रकमेचे डेथ कव्हर घेऊ शकते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला वार्षिक प्रीमियमच्या सात पट किंवा देय एकूण प्रीमियमच्या 105% पैसे मिळतील. हा नियम नियमित प्रीमियम पॉलिसीसाठी आहे. जर एखाद्या व्यक्तीने सिंगल प्रीमियम पॉलिसी घेतल्यावर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना सिंगल प्रिमीयम किंवा विमा राशीच्या 125 टक्के पैसे मिळतील.

3/5
न्यू जीवन मंगल पॉलिसी घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे असावे. पॉलिसीधारकाचे वय 65 वर्षे पूर्ण झाल्यावर ही योजना पूर्ण होईल. किमान 10 हजार आणि कमाल 50 हजार पॉलिसी सम अॅश्युअर्ड म्हणून घ्यावी लागते.  जर एखाद्या व्यक्तीने 20,000 विमा रकमेची पॉलिसी घेतली आणि पॉलिसीची मुदत 10 वर्षे ठेवली तर त्याला एका वर्षात नियमित प्रीमियम म्हणून 1,191 रुपये भरावे लागतील.

4/5
विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, विमा रकमेच्या बरोबरीची अतिरिक्त रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाते. पॉलिसी चालू होईपर्यंत पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास मॅच्युरिटी बेनिफिट अंतर्गत विमा रक्कम दिली जाते. केवळ ही पॉलिसी सुरु असली पाहिजे आणि त्याच्या प्रीमियमध्ये कोणताही खंड पडता कामा नये, इतकीच अट आहे. या पॉलिसीमध्ये आयकर कलम 80 सी अंतर्गत करमाफीचा लाभ उपलब्ध आहे. हा लाभ प्रीमियम आणि पेमेंट करमुक्त आहे.

5/5
जर पॉलिसी कोणत्याही कारणामुळे बंद केली गेली असेल तर ती पुन्हा चालू केली जाऊ शकते. तुम्ही शेवटच्या प्रीमियम भरल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत सर्व थकीत प्रीमियम भरण्यासह पॉलिसी पुनरुज्जीवित करू शकता. व्याजाची रक्कम भारतीय जीवन विमा महामंडळाद्वारे निश्चित केली जाते. पॉलिसी मॅच्युअर होणयापूर्वी पॉलिसी पुनरुज्जीवन शक्य आहे. सिंगल प्रीमियम पेमेंट मोड असलेले पॉलिसीधारक पॉलिसी टर्म दरम्यान कधीही पॉलिसी सरेंडर करू शकतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI