UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ज्या उमेदवारांनी ती पार केली त्यांची कहाणी लाखो तरुणांना नेहमीच प्रेरणा देते. IAS अधिकारी प्रियांका शुक्लाची कथाही अशीच प्रेरणादायक आहे, तिची कथा इतरांपेक्षा वेगळी आणि खुप रंजक आहे.
1 / 5
प्रियांका शुक्लाने किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज (KGMU) मध्ये शिक्षण घेतले आणि तिथून एमबीबीएस पूर्ण केले. त्यांनी आयएएस अधिकारी (IAS officer) व्हावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची नेहमीच इच्छा होती.
2 / 5
प्रियंका सांगते की, तिच्या वडिलांनी सांगितले की त्यांना प्रियांकाच्या नावाची पाटी त्यांच्या घरासमोर कलेक्टर (Collector) म्हणून छापलेली पहायची आहे. अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर तीने अभ्यासाला सुरूवात केली.
3 / 5
प्रियांकाने एमबीबीएस प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी लखनौमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. डॉक्टर झाल्याचा तिला खूप आनंद झाला. पण एका घटनेने किंवा एखाद्या अपमानाने त्याचे आयुष्य बदलून टाकले असे म्हणता येईल. एकदा प्रियांका झोपडपट्टी भागात चेकअप करण्यासाठी गेली होती. तिथे एक महिला घाणेरडे पाणी पीत होती आणि मुलांनाही पाजत होती. प्रियांकाने त्या महिलेला गलिच्छ पाणी पिण्यास मनाई केली. त्यावर ती महिला म्हणाली की तुम्ही कुठल्या कलेक्टर आहात का? हे ऐकून प्रियंका हादरली आणि तिने आयएएस होण्याचा निर्णय घेतला.
4 / 5
पहिल्याच प्रयत्नात प्रियंका यूपीएससीमध्ये नापास झाली, पण तिने हार मानली नाही आणि कलेक्टर व्हायचे ठरवले. अखेर 2009 मध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. आयएएस अधिकारी झाल्यानंतर प्रियंका शुक्ला यांनी लोकांचे जीवन बदलण्याचे ध्येय बनवले आहे.