AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तू सेक्स वर्कर झाली आहेस का?’ मराठी अभिनेत्री झाली साडीवरून ट्रोल, दिलं सडेतोड उत्तर

साडी नेसण्याच्या पद्धतीवरून मराठी अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. इतकंच नाही, तर धमक्याही देण्यात आल्या! या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्रीनं व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या...

| Updated on: Oct 13, 2026 | 5:02 PM
Share
अभिनेत्री आणि मराठी कंटेंट क्रिएटर ऊर्मिला निंबाळकर सध्या तिच्या ‘पुरुषांवर बोलू काही’ या लाइव्ह शोमुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमाला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, तिच्या साडीवरून सोशल मीडियावर टीका करण्यात आली.

1 / 6
ऊर्मिलानं शोदरम्यान नेसलेल्या गुलाबी साडीतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, तिच्या साडी नेसण्याच्या पद्धतीवरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. या ट्रोलिंगनं गंभीर स्वरूप घेत तिला सामूहिक बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या.

2 / 6
या प्रकाराबाबत ऊर्मिलानं व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूब आणि खासगी संदेशांमधूनही तिला आक्षेपार्ह प्रतिक्रिया मिळाल्याचं तिनं सांगितलं. वाढत्या ट्रोलिंगमुळे तिला संबंधित पोस्ट आणि रील आर्काइव्ह करावी लागली.

3 / 6
साडी नेसण्याच्या विविध पद्धती या भारतीय परंपरेचा भाग असल्याचं ऊर्मिलानं सांगितलं. भारतात साडी नेसण्याच्या शंभरहून अधिक पद्धती आणि शैली असल्याचा उल्लेख करत तिनं प्रत्येक शैलीमागील इतिहास आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्याची गरज अधोरेखित केली.

4 / 6
साडी नेसवण्याचं प्रशिक्षण आणि अभिनय क्षेत्रातील अनुभवामुळे ऊर्मिलाला वेगवेगळ्या पद्धतीनं साडी नेसता येते. मात्र, शोसाठी नेसलेली गुलाबी साडी तिच्यासाठीही आव्हानात्मक होती. साडीचा विशिष्ट आकार आणि घेर यामुळे ती नेहमीच्या पद्धतीनं व्यवस्थित नेसणं शक्य नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं.

5 / 6
साडीवरून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना ऊर्मिलानं महिलांच्या कपड्यांवरून त्यांचं चारित्र्य ठरवण्याच्या मानसिकतेवर टीका केली. साडीच्या एका बाजूला कंबर दिसली तर संस्कृती जपणारी आणि दुसऱ्या बाजूला दिसली तर चुकीची, असा दुहेरी दृष्टिकोन का, असा सवाल तिनं उपस्थित केला. ‘तू सेक्स वर्कर झाली आहेस का?’ अशा प्रकारची टिप्पणीही एका महिलेनं केल्याचं तिनं सांगितलं. या सगळ्या प्रकारानंतरही शोला मिळणारा प्रतिसाद आणि महिलांचा सहभाग पाहून आपण आनंदी असल्याचं ऊर्मिलानं स्पष्ट केलं.

6 / 6
Follow Us
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय