By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत आहेत.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मते, जोरदार वारा आणि पावसामुळे ओव्हरहेड वायर्स ट्रीपिंगच्या समस्या उद्भवत आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये सर्वत्र वाऱ्यासह पाऊस झाला. ठिकठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दादरमधील शिवाजी पार्क परिसरात शिवतीर्थ नावाने घर आहे. त्यांच्या घराच्या पाठीमागेही एक मोठे झाड कोसळले.
हे झाड कोसळून थेट दोन कारवर पडले. या दुर्घटनेत दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.