Photo : रुपेरी वाळूत… निया शर्माचा किलर अंदाज!

टीव्हीच्या दुनियेवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री निया शर्मा गोव्याहून नुकतीच परतली आहे.(Nia Sharma’s amazing look, see photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:30 PM, 24 Nov 2020
टीव्हीच्या दुनियेवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री निया शर्मा गोव्याहून नुकतीच परतली आहे.
मुंबईत आल्यानंतर तिने गोव्यातील या धम्माल मस्तीचे फोटो तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या सर्व फोटोंमधून नियाचे वेगवेगळे मूड्स आणि अदा दिसून येत आहेत.
एका फोटोत तर ती ब्लॅक ड्रेस घालून गोव्याच्या समुद्र किनारी बसलेली दिसतेय. अंगावर वाळू आणि कोवळं ऊन घेत असलेली निया अधिकच सुंदर भासतेय.
'मोकळे सोडलेले केस, भुऱ्या रंगाची त्वचा आणि वाळूचा झालेला पदस्पर्श...' अशी सुंदर कॅप्शन या फोटोला देत तिने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
दुसऱ्या एका फोटोला तर तिने, 'मला तिथे भेटा, जिथे आकाश सागराला स्पर्श करतो', अशी काव्यात्मक कॅप्शन दिली आहे.