PHOTO : डोक्यावर पगडी, खांद्यावर भरजरी शाल, शतकवीर बाबासाहेबांच्या सोहळ्यात राज ठाकरे, आशिष शेलार

पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शतक महोत्सवी वर्षारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, इतिहासकार गजानन मेहेंदळे, आमदार आशिष शेलार हे देखील यावेळी उपस्थित होते.

1/7
पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शतक महोत्सवी वर्षारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला.

2/7
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, इतिहासकार गजानन मेहेंदळे, आमदार आशिष शेलार हे देखील यावेळी उपस्थित होते.

3/7
बाबासाहेब पुरंदरे लिखित 'ओंजळ' या पुस्तकाचेही या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. आशा भोसले आणि इतर महिलांच्या हस्ते पुरंदरे यांचे औक्षण करण्यात आले.

4/7
सत्कार सोहळ्याआधी शिवकल्याण राजा या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

5/7
इतिहासकार गजानन मेहंदळे यावेळी म्हणाले, "बाबासाहेब हे इतिहास संशोधक आहेत. शिवशाहीर या पदवीमुळे त्यांची इतिहास संशोधक ही ओळख झाकोळून गेली. ते इतिहास संशोधक आहेत म्हणून शिवशाहीर आहेत."

6/7
राज ठाकरे म्हणाले, "मी 6 वर्षांचा असताना पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं. त्याच्यानंतर कित्येक वर्षे मी त्यांना फक्त पाहत होतो, वाचत होतो. आता मला त्यांचा सहवास लाभला. बाबासाहेब इतिहास जरी सांगत असले तरी ते वर्तमानात भानावर यायला शिकवतात. इतिहासात ज्या चुका केल्या, त्या वर्तमानात करू नये हे सांगतात. इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा इतिहास बाबासाहेब सांगतात."

7/7
राज ठाकरे, बाबसाहेब पुरंदरे, आशा भोसले आणि आशिष शेलार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI