AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी उठताच ठणकू लागतं डोकं ? या उपायांनी कमी होईल डोकेदुखीचा त्रास

सकाळी जागे होताच डोकं जड वाटण, कामात मन एकाग्र करता न येणं किंवा कोणतंही कारण नसताना चिडचिड होणं ही काही सामान्य बाब नसून, झोपेच्या गंभीर विकाराचे संकेत असू शकतात. हे का होतं आणि यावपासून कसा बचाव करता येईल, जाणून घेऊया.

| Updated on: Sep 22, 2026 | 4:56 PM
Share
सकाळी अंथरुणातून उठताच डोकं प्रचंड दुखणं, कोणतंही ठोस कारण नसताना चिडचिड होणं किंवा ऑफिसच्या कामात लक्ष केंद्रित न करता येणं हे साधं नाही. अपुरी आणि खराब झोपेमुळे हे होऊ शकतं. असं अधूनमधून घडत असेल तर चिंतेचं कारण नाही; मात्र ही समस्या रोजची असेल, तर झोपण्याच्या सवयींकडे तातडीने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे.

1 / 7
न्यूरोलॉजिस्टच्या मते, आजच्या काळात रात्री उशिरापर्यंत स्मार्टफोन स्क्रोल करणं, कामाच्या ताणामुळे उशिरा झोपणं, रात्री वारंवार झोपमोड होणं, आणि दररोज वेगवेगळ्या वेळी झोपण्याची सवय हे सामान्य झालं आहे. अशा बिघडलेल्या जीवनशैलीला अनेकदा नॉर्मल मानलं जातं. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अनेक लोक हे मोबाइलमध्ये खूप गुंतलेले असतात.

2 / 7
दुसऱ्या दिवशी शरीर आणि मेंदूवर थेट परिणाम : तज्ज्ञांच्या मते, झोपेशी संबंधित या चुकीच्या सवयींमुळे शरीर आणि मेंदूला आवश्यक विश्रांती मिळत नाही. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी स्पष्टपणे जाणवतो—पुरेशी झोप घेतल्यानंतरही सकाळी खूप थकवा आणि सुस्ती जाणवणं, कोणत्याही कामात मन न लागणं आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर राग येणं , असा त्रास जाणवू शकतो.  स्मरणशक्ती कमजोर होणं आणि एकाग्रतेत मोठी घट होणं - दीर्घकाळात असा त्रास जाणवू शकतो.

3 / 7
सकाळी होणारी डोकेदुखी ही महत्त्वाची चेतावणी :  जर डोकेदुखीसोबत रात्री मोठ्याने घोरणं, झोपेत श्वास घेण्यास त्रास होणं (स्लीप ॲप्निया) किंवा वारंवार दचकून जाग येणं अशी लक्षणं दिसत असतील, तर ते झोपेच्या गंभीर विकाराचे संकेत असू शकतात. अशा लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

4 / 7
फक्त जास्त तास झोप पुरेशी नाही : चांगली झोप म्हणजे केवळ  8 किंवा 9  अंथरुणावर पडून राहणं नव्हे, तर झोप सलग आणि गाढ (डीप स्लीप) असणंही गरजेचं आहे. झोपेदरम्यान मेंदू दिवसभराच्या मानसिक थकव्यातून सावरतो आणि शरीरातील पेशींची दुरुस्ती व पुनर्बांधणी होते. खराब झोपेचा परिणाम केवळ दुसऱ्या दिवशी जाणवणाऱ्या थकव्यापुरता मर्यादित नसतो. तर दीर्घकाळात विचार करण्याची क्षमता, मनःस्थिती आणि मानसिक आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

5 / 7
झोप सुधारण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स: दररोज रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एक निश्चित वेळ ठरवा. झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्हीसारख्या डिजिटल स्क्रीनपासून पूर्णपणे दूर राहा.  संध्याकाळनंतर किंवा रात्री चहा-कॉफीसारख्या कॅफिनयुक्त पेयांचं सेवन टाळा. पुरेसा वेळ झोपूनही सकाळची डोकेदुखी आणि दिवसभर झोप येण्याची समस्या कायम राहिल्यास, घरगुती उपायांवर अवलंबून न राहता योग्य न्यूरोलॉजिस्ट किंवा स्लीप स्पेशालिस्टचा सल्ला घेणं उत्तम ठरेल.

6 / 7
( डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी संबंधित  क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

7 / 7
Follow Us
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय

कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल

मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा
Video : मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा, गणेशोत्सवाची अनोखी संकल्पना
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!
11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
By Election : 11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?