सत्यशोधक आंदोलनातले एक धडाडीचे समाजसुधारक आणि प्रभावी लेखक पत्रकार म्हणून सर्वश्रूत असणारे लेखक म्हणजे केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. विचारवंत, नेते, लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, वक्ते, धर्मसुधारक, समाजसुधारक, इतिहाससंशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ, शिक्षक, भाषाविद, लघुउद्योजक, फोटोग्राफर, टायपिस्ट, चित्रकार अशी सगळी विशेषणं लावूनही त्यांची ओळख आपण एका शब्दात सांगू शकत नाही.