Headache relief remedies : अनेकदा चुकीच्या आहारामुळे (Diet) किंवा ताण-तणावामुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास होतो. त्याचा परिणाम हा आपल्या कामावर देखील होतो. डोक दुखत असल्यास अनेकांना गोळी घेण्याची सवय असते. मात्र तसे न करता काही घरगुती उपयांच्या माध्यमातून देखील तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो. आज आपण अशाच काही उपयांबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
गरम पाणी आणि लिंबू : कधी कधी शरीरात गॅस तयार झाल्यामुळेही डोकेदुखी सुरू होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू मिसळा. हे मिश्रण चांगले ढवळून घ्या, त्यानंतर हे पाणी प्या. तु्म्हाला डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो.
1 / 5
सफरचंद आणि काळे मीठ : हा देखील एक उत्तम घरगुती उपाय मानला जातो. एक सफरचंद घ्या आणि त्याचे काप करा. आता त्यावर काळे मीठ टाकून हे सफरचंदाचे काप खा. गॅसची समस्या दूर करण्यासाठी काळे मीठ गुणकारी मानले जाते.
2 / 5
लवंग : डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी लवंगाचा वास घेणे देखील चांगले मानले जाते. यासाठी तव्यावर लवंग भाजल्यानंतर रुमालात बांधून ठेवा. त्यानंतर रुमालात बांधलेल्या लंवगाचा वास घ्या. डोकेदुखीपासून आराम मिळेल.
3 / 5
तुळस आणि आले : या दोन्ही वनस्पतींचा रस काढून कपाळावर लावल्यानेही डोकेदुखी कमी होते. तुम्ही हा रस पाण्यात मिसळून पिऊ देखील शकता. यामुळे तुम्हाला डोकेदुखीपासून लगेच आराम मिळेल.