पुण्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील पूल तुटल्याने 30 पेक्षा जास्त लोक वाहून गेले होते. यातील बऱ्याच पर्यटकांना बचाव पथकांने बाहेर काढलं आहे.
1 / 7
तर या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे. दरम्यान आता या दुर्घटनेत बचावलेल्या एका पर्यटकाने दुर्घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे.
2 / 7
अवघ्या तीन सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं, असं या पर्यटकाने म्हटलं आहे.
3 / 7
इंद्रायणी नदीच्या दुर्घटनेत गणेश पवार नावाची व्यक्ती सुदैवाने बचावली आहे. त्यांनी पूल नेमका कसा कोसळला? याची सविस्तर माहिती दिली आहे. या दुर्घटनेत माझी दुचाकी वाहून गेली, असं त्यांनी म्हटलंय.
4 / 7
तसेच हा अपघात अवघ्या दोन ते तीन सेकंदांत घडला. पूल कोसळत असताना मी एका ठिकाणी पकडले. त्यामुळे सुदैवाने मी वाचलो, अशी माहिती गणेश पवार यांनी दिली.
5 / 7
तसेच, आमचं या पुलावरून रोज येणं-जाणं असतं. हा पूल जीर्ण झालेला आहे. हा पूल पूर्णपणे वाकलेला होता. हा पूल मधोमध पडला आहे, असं गणेश पवार यांनी सांगितलं.
6 / 7
दरम्यान, या दुर्घटनेमुळे वाहून गेलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या परिसरात रुग्णवाहिका आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य केले जात आहे.