Zilla Parishad Election Result 2026 Full Winner List: कोणत्या जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता?
Zilla Parishad Election Panchayat Samiti Result 2026 Winner List LIVE Updates in Marathi: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडलं असून आता या 12 जिल्हा परिषद निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या उमेदवारांचे निकाल हाती येत आहेत.
राज्यातील 12 जिल्हा परिषद तर 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक पार पडली असून आज या निवडणुकांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी 7 हजार 438 उमेदवार हे रिंगणात उभे राहिले होते. अशातच आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
Zilla Parishad Election Result 2026 Full Winner List: माळशिरसमधील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट नुसार निकाल….
1 दहिगाव गट : संस्कृती सातपुते, भाजप
2 फोंडशिरस गट : अर्जुनसिंह मोहिते पाटील : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
3 मांडवे गट : गौतम माने : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
4 संग्रामनगर गट : सुषमा नारनवर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
5 माळीनगर गट : मारुती लोंढे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
6 बोरगांव गट : नागनाथ भोसले : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
7 वेळापूर गट : मिनाक्षी मिलींद सरतापे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
8 निमगांव गट : निलीवती मच्छिंद्र ठवरे : शिवसेना (शिंदे गट धनुष्यबाण)
9 पिलीव गट : चंद्रकांत जाधव : भाजपा
9 पैकी 7 राष्ट्रवादी, 2 भाजप —————————- पंचायत समिती माळशिरस गण नुसार निकाल..
1 गुरसाळे गण – दशरथ शेळके : भाजप
2 दहिगाव गण – सौ.कमल खिलारे : भाजप
3 भांबुर्डी गण – प्रवीण वाघमोडे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
4 फोंडशिरस गण – सौ.सोनल पाटील : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
5 मांडवे गण – सौ.राजश्री पालवे : भाजप
6 कण्हेर गण – आनंदराव शेंडगे : भाजप
7 लवंग गण – सौ.ऋतुजा पराडे : भाजप
8 माळीनगर गण – महादेव साबळे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
9 बोरगांव गण – मनिषा नाईकनवरे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
10 जांबूड गण – आप्पासाहेब पाटील : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
11 मेडद गण – युवराज झंजे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
12 संग्रामनगर गण – निशा गिरमे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
13 वेळापूर गण – सौ.विमल जानकर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
14 यशवंतनगर गण – सौ.वैष्णवी मोहिते-पाटील : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
15 निमगांव गण – दत्तात्रय रावसो मगर : शिवसेना (शिंदे गट धनुष्यबाण)
16 गोरडवाडी गण – रेश्मा जगन्नाथ माने : शिवसेना (शिंदे गट धनुष्यबाण)
17 पिलीव गण – नम्रता शिवराज पुकळे : भाजपा
18 तांदुळवाडी गण – मनिषा पाटील : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
18 पैकी 12 राष्ट्रवादी, 6 भाजप
-
Zilla Parishad Election Result 2026 Full Winner List: कोणत्या जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता?
राज्यातील 12 पैकी 7 जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. यात सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा आणि सोलापूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्हा परिषदांवर भगवा फडकवला आहे. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने शानदार विजय मिळवला आहे. सांगलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने विजय मिलवला आहे.
-
-
Zilla Parishad Election Result : पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा, या पक्षाला मिळाल्या सर्वात कमी जागा
पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा…. 125 पैकी 52 पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता… तर शिंदेंची शिवसेना 26, राष्ट्रवादी 25, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8 तर ठाकरेंच्या शिवसेनाला सर्वात कमी 5 जागा….
-
Solapur Zilla Parishad Election Result 2026 Winner List : करमाळ्यातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
करमाळा जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुक २०२६ विजयी उमेदवार माहिती
1) पांडे जिल्हा परिषद गट – भारतीय जनता पार्टी – रश्मी दिगंबर बागल
2) वीट जिल्हा परिषद गट – भारतीय जनता पार्टी – आश्विनी गणेश चिवटे
3) चिखलठाण जिल्हा परिषद गट – प्रशांत हनुमंतराव पाटील – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (अ.प.गट)
4) कोर्टी जिल्हा परिषद गट – वनिता सुभाष गुळवे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प.गट)
5 ) वांगी जिल्हा परिषद गट – रुपाली ज्ञानेश्वर गोडसे करमाळा तालुका विकास आघाडी ( आमदार नारायण पाटील गट )
6 ) केम जिल्हा परिषद गट – कल्याणी अजित तळेकर करमाळा तालुका विकास आघाडी ( आमदार नारायण पाटील गट )
करमाळा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ विजयी उमेदवार माहिती
1) रावगांव पंचायत समिती गण – सध्या कांबळे – भारतीय जनता पार्टी
2) वीट पंचायत समिती गण – पुजा सचिन ढेरे – भारतीय जनता पार्टी
3) वांगी पंचायत समिती गण – सोनाली तकीक – -भारतीय जनता पार्टी
4) कोर्टी पंचायत समिती गण – नाना झाकणे – भारतीय जनता पार्टी
5) चिखलठाण पंचायत समिती गण – वनमाला चंद्रकांत सरडे – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (अजित पवार गट)
6) हिसरे पंचायत समिती गण – भरत अवताडे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प.गट)
7 ) केतूर पंचायत समिती गण – आजिनाथ सर्जेराव विध्ने – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प.गट)
8) साडे पंचायत समिती गण – दशरथ भगवान घाडगे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प.गट)
9 ) उमरड पंचायत समिती गण – आदिती अतुल पाटील – करमाळा तालुका विकास आघाडी
10 ) जेऊर पंचायत समिती गण – ललिता शिरसकर – करमाळा तालुका विकास आघाडी ( आमदार नारायण पाटील गट )
11) केम पंचायत समिती गण – ज्ञानेश्वर बिचितकर – करमाळा तालुका विकास आघाडी ( आमदार नारायण पाटील गट )
12 ) पांडे पंचायत समिती गण – स्वप्निल काळे – करमाळा तालुका विकास आघाडी ( आमदार नारायण पाटील गट )
करमाळा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती पक्षीय निहाय बलाबल
करमाळा जिल्हा परिषद 6 गट
भाजप – 02
राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) – 02
करमाळा तालुका विकास आघाडी ( आमदार नारायण पाटील गट ) – 02
करमाळा पंचायत समिती 12 गण निकाल
भाजप – 04
राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) – 04
करमाळा तालुका विकास आघाडी – ( आमदार नारायण पाटील गट – 04
-
Zilla Parishad Election Result : मोठी बातमी 12 पैकी 7 झेडपीत भाजपचं वर्चस्व
जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका…. 12 पैकी 7 झेडपीत भाजपचं वर्चस्व…. शिंदेंची शिवसेना 2, राष्ट्रवादी 2… पवारांची राष्ट्रवादीच्या पारड्यात 1 जागा तर काँग्रेस, आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातंही उघडता आलं नाही
-
-
शरद पवारांवर रुग्णालयात उपचार सुरू, सुप्रिया सुळेंनी दिली हेल्थ अपडेट
शरद पवार यांना पाच दिवस दिले जाणार अँटिबायोटिक्स, सुप्रिया सुळे यांची माहिती
शरद पवार यांच्या छातीत कंजेक्श झाल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती
शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याचं सुप्रिया सुळे यांनी केलं स्पष्ट
सुप्रिया सुळे यांनी मानले डॉक्टरांचे आभार
-
दत्तात्रय भरणे यांच्या मुलाचा पंचायत समिती निवडणुकीत विजय
दत्तात्रय भरणे यांच्या मुलाचा पंचायत समिती निवडणुकीत विजय झाला आहे. श्रीराज भरणे यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. विजय मिळाला आहे याचा आनंद आहे, मात्र दुसरीकडे अजित पवार हयात नाहीत याचं दुःखही आहे. विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो जनतेने आम्हाला स्वीकारलं, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी श्रीराज भरणे यांनी दिली आहे.
-
सांगली जिल्ह्यात कोणत्या पंचायत समितीमध्ये कोणाची सत्ता? निकाल समोर
सांगली जिल्ह्यात कोणत्या पंचायत समितीमध्ये कोणाची सत्ता?
1) वाळवा – राष्ट्रवादी शरद पवार गट
2 ) शिराळा – दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सत्ता
3) तासगाव – राष्ट्रवादी अजित पवार घड्याळ
4 ) कवठेमहांकाळ – राष्ट्रवादी शरद पवार गट
5) जत – भाजप
6) आटपाडी – शिवसेना
7) मिरज – भाजप
8) खानापूर- शिवसेना शिंदे गट
9) कडेगाव – काँग्रेस
10) पलुस – काँग्रेस
-
सांगली जिल्हा परिषदेत महायुतीला रोखण्यात महाविकास आघाडीला यश
सांगली जिल्हा परिषदेत जवळपास सत्ता परिवर्तन झालेलं आहे, भाजपा महायुतीला सत्येपासून रोखण्यात महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे, जिल्हा परिषदेमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही, मात्र तरी देखील महाविकास आघाडी ही सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट हा सांगली जिल्हा परिषदेतला सर्वात मोठा पक्ष ठरलाय, 61 पैकी 18 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपा हा दोन नंबर पक्ष ठरला असून, काँग्रेसला 11 जागा मिळाल्या आहेत.
-
Zilla Parishad Election Result : मोठी बातमी, 125 पंचायत समितीपैंकी 51 जागांवर भाजपचा विजय, दुसऱ्या नंबरवर हा पक्ष
राज्यातील पंचायत समिती निवडणुकांचे निकाल लागले असून यामध्ये सर्वात मोठा विजय हा भाजपला मिळाला आहे. 125 पैकी 51 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर दुसऱ्या नंबरवर शिवसेना शिंदे पक्ष आहे. शिवसेनेचे 26 उमेदवार विजयी झाले आहेत.
-
Zilla Parishad Election Result : जिल्हा परिषद निवडणुकांमधील निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
अजित पवारांच्या निधनाचं आम्हाला दु:ख आहे. राज्यातील 7 जिल्हा परिषदांमध्ये भाजप नंबर 1. महायुतीला 125 पैकी 100 च्या वर पंचायत समिती जिंकता आल्या. आमच्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केलाय. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
-
Zilla Parishad Election Result : 125 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जवळपास आले असून यामध्ये 125 जागांपैकी सर्वात जास्त जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. यामध्ये भाजप 48, शिवसेना 26, राष्ट्रवादी अजित पवार 23, राष्ट्रवादी शरद पवार 8, काँग्रेस 8, शिवसेना ठाकरे गट 5 आणि इतरमध्ये 1.
-
Dharashiv Zilla Parishad Election Result : धाराशिवमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराचा एका मतानं विजय, किती मिळाली मतं?
धाराशिवमधील ढोकी पंचायत समितीत ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार एका मतानं विजयी… ठाकरेंचे उमेदवार अमर समुद्रे यांना 3 हजार 187 मतं तर भाजपाच्या निहाल काजींना 3 हजार 186 मतं
-
जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी
आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी. शिंदे शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांचा 980 मतांनी केला पराभव. माधवी पडळकर या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी
-
Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad Election Result : संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाला किती जागा?
संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल सध्या समोर आले आहेत. यामध्ये 63 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने 22 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला 18, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2, शरद पवार गटाला 1, काँग्रेस 2, ठाकरे गटाला 09 जागांवर आणि इतरमध्ये 7 जणांचा समावेश आहे.
-
Pune Zilla Parishad Election Result : पुण्यात भाजपला मोठा धक्का, 73 जागांपैकी फक्त 8 जागांवर विजय, या पक्षाच्या सर्वात जास्त जागा
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का मिळाला आहे. 73 जागांपैकी पुण्यात भाजपला फक्त 8 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 39 जागांवर विजय मिळवता आला आहे.
-
Raigad Zilla Parishad Election Result : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, आतापर्यंत एकही उमेदवार विजयी नाही
जिल्हा परिषद निवडणुकीत जरी भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी रायगड जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. आतापर्यंत भाजपचा रायगडमध्ये एकही उमेदवार जिंकला नाही.
-
Dharashiv Zilla Parishad Election Result : धाराशिवमध्ये भाजपला धक्का, 55 जागांपैकी फक्त 10 जागांवर विजय
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये 55 जागांपैकी भाजपला फक्त 10 जागांवर विजय मिळाला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे 12 जण विजयी झाले आहेत.
-
Kolhapur Election Results 2026 : कोल्हापूर पंचायत समितीचे लाईव्ह अपडेट…
कोल्हापूर
पंचायत समिती
शाहूवाडी 8
भाजप – 2 काँग्रेस -2 राष्ट्रवादी -2 शिवसेना – शिवसेना ठाकरे – 1 जनसुराज्य -1
पन्हाळा 12
भाजप – काँग्रेस – 1 राष्ट्रवादी – 2 शिवसेना- 1 जनसुराज्य – 3
हातकंणगले 22
भाजप – 5 काँग्रेस -5 राष्ट्रवादी -5 शिवसेना -1
शिरोळ 14
भाजप – 7 काँग्रेस – 2 राष्ट्रवादी -1 शिवसेना-1 स्वाभिमानी – 4
करवीर 24
भाजप – 4 काँग्रेस -8 राष्ट्रवादी -4 शिवसेना-3
गगनबावडा – 4
भाजप – काँग्रेस -4 राष्ट्रवादी शिवसेना
राधानगरी 10
भाजप – 1 काँग्रेस -2 राष्ट्रवादी- 2 शिवसेना -5
कागल – 12
भाजप – 7 काँग्रेस – राष्ट्रवादी – 4 शिवसेना- 1
भुदरगड – 8
भाजप – काँग्रेस -2 राष्ट्रवादी शिवसेना- 6
आजरा 4
भाजप – 2 काँग्रेस – राष्ट्रवाद – शिवसेना- 2
गडहिंग्लज – 10
भाजप – 2 काँग्रेस -1 राष्ट्रवादी – 6 शिवसेना 1
चंदगड -8
भाजप – 3 काँग्रेस – राष्ट्रवादी – 4 शिवसेना जनसुराज्य – 1
-
Zilla Parishad Election Result : कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये कांटे की टक्कर! कोणाला किती जागा?
कोल्हापूर जिल्हा परिषदांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये कांटे की टक्कर झाल्याचं बघायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये 68 जागांपैकी भाजपला 10, शिवसेनेला 10 आणि अजित पवार गटाला 10 जागांवर विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला कोल्हापूरमध्ये एकही जागा मिळाली नाही.
-
Zilla Parishad Election Result 2026 : सोलापूर जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का
राज्यातील अनेक जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल हाती आले असून यामध्ये सोलापूरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मिळाल्याचं बघायला मिळत आहे. 68 जागांपैकी शरद पवार गटाला सोलापुरात एकही जागा जिंकता आली नाही.
-
Pune Election Results 2026 : आंबेगाव जिल्हा परिषद फायनल
अजित पवार राष्ट्रवादी – ०३ शिंदे शिवसेना – ०१ शरद पवार राष्ट्रवादी – ०१
पारगाव जिल्हा परिषद विवेक वळसे पाटील राष्ट्रवादी ap
अवसरी बु जिल्हा परिषद विष्णू काका हिंगे राष्ट्रवादी ap
कळंब जिल्हा परिषद प्रीती प्रवीण थोरात राष्ट्रवादी sp
घोडेगाव जिल्हा परिषद सुवर्णा देविदास दरेकर शिवसेना शिंदे गट
शिनोली जिल्हा परिषद शीला राजेंद्र लोहोकरे राष्ट्रवादी ap
-
Zilla Parishad Election Result : जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाने मारली बाजी? वाचा संपूर्ण यादी
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल सध्या हाती येत आहेत. यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजप ठरला असून भाजपने 125 जागांपैकी 45 जागांवर विजय मिळवला आहे. तर यामध्ये शिवसेना पक्षाने 24 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 20 जागांवर, राष्ट्रवादी शरद पवार गटाने 8 जागांवर तर काँग्रेसने 8 जागां आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 5 जागांवर विजय मिळवला आहे.
-
Zilla Parishad Election Result : पंचायत समिती निवडणुकीत भाजपला मोठं यश, 125 जागांपैकी 40 जागांवर मोठा विजय
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल हाती येत असून यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजप ठरला आहे. भाजपचे आतापर्यंत 125 पंचायत समितीपैंकी 40 पंचायत समितींवर विजय मिळवला आहे.
-
Sangli Zilla Parishad Election Result : सांगलीमध्ये 11 पैकी 7 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी
सांगलीतील वाळावा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 7 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तर 3 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी…. बागणी जिल्हा परिषदेतून आमदार सदाभाऊ खोत यांची सून मोहिनी खोत विजयी….तर महायुतीतील मोहिनी सागर खोत विजयी….
-
Solapur Zilla Parishad Election Result: मोठा बातमी, आमदार दिलीप सोलपांना मोठा धक्का
सोलापूर-बार्शी तालुक्यात ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपलांना मोठा धक्का मिळाला आहे. ज्यामध्ये 12 जागांपैकी भाजपचे 9 उमेदवार हे विजयी झाले आहेत.
-
पंचायत समितीतीवरही भाजपचा झेंडा,125 पैकी 30 ठिकाणी भाजपचं वर्चस्व तर…
Zilla Parishad Election Result : पंचायत समितीतीवरही भाजपचा झेंडा…. 125 पैकी 30 ठिकाणी भाजपचं वर्चस्व… तर शिंदेंची शिवसेना 17, राष्ट्रवादी 20, पवारांची राष्ट्रवादी 11, काँग्रेस 8… तर ठाकरेंच्या शिवसेनाला सर्वाधिक कमी 5 जागा….
-
मोठी बातमी, करमाळा गटातून भाजपच्या रश्मी बागल विजयी
Solapur Zilla Parishad Election Result 2026 : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल सध्या हाती येत आहेत. अशातच सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूर-करमाळा गटातून भाजपच्या रश्मी बागल या विजयी झाल्या आहेत.
-
Solapur Election Results 2026 : सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का…
सोलापूरमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली असून प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपाने जिल्हा परिषदेवर आपला झेंडा लावला आहे.
-
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप मोठा पक्ष, 12 पैकी 7 परिषदांमध्ये भाजप आघाडीवर
Zilla Parishad Election Result 2026 Winner LIVE: जिल्हा परिषद निवडणुकांचे कल सध्या हाती येत आहेत. ज्यामध्ये भाजप हा पक्ष एक नंबरचा पक्ष ठरला आहे. ज्यामध्ये भाजपने 12 जिल्हा परिषदांपैकी 7 परिषदांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. यामुळे अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते गुलाल उधळताना दिसत आहेत.
-
Maharashtra Zilla Parishad Election Results : तानाजी सावंत यांचा पुतण्या आघाडीवर..
तानाजी सावंत यांचा पुतण्या विजयी झाला आहे. तानाजी सावंत यांचा पुतण्या पाच हजार मतांनी विजयी झाला. पुतण्या पृथ्वीराज सावंत यानेकाका तानाजी सावंत यांच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवली होती…
-
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत समितीचे 17 गण बिनविरोध
Sindhudurg Zilla Parishad Election Results: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत समितीचे 17 गण बिनविरोध… जिल्हा परिषदेतील खारेपाटण, बांदा, जाणवलीचा गट बिनविरोध
Published On - Feb 09,2026 11:00 AM

