PHOTO | ‘कीस काँट्रोवर्सी’ विसरून पुन्हा घेतली एकमेकांची ‘गळाभेट’, राखी सावंत-मिका सिंगचे फोटो चर्चेत!

बॉलिवूडचा सुपरहिट पंजाबी गायक मिका सिंह (Mika Singh) सध्या कोरोनाकाळात मुंबईतील लोकांना मदत करण्याचे काम करत आहे. अशा परिस्थितीत आज त्याला चक्क ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतसोबत स्पॉट केले गेले होते. त्याच्या या भेटीनंतर त्यांच्यात वैर संपल्याचे दिसून आले आहे. मीका सिंह दिसताच राखीने थेट त्याला मिठी मारली. सध्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

1/6

2/6
राखी सावंत (Rakhi Sawant) नुकतीच लोखंडवाला सर्कल येथील एकी कॉफी शॉपमध्ये स्पॉट झाली होती.
3/6
याचदरम्यान गायक मीका सिंग देखील तिथे पोचला आणि त्याला पाहून राखी सावंत हिला काहीसा आश्चर्याचा धक्का बसला होता.
4/6
मीका सिंगकडे पाहताच राखी सावंतने त्याला थेट मिठी मारली.
5/6
मीका सिंह आणि राखी सावंत यांच्यात मोठा वाद झाला होता. मीका सिंगने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये राखी सावंतला बराच वेळ कीस केला होता. यावरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता.
6/6
कोरोना साथीच्या आजारात सध्या मीका सिंग दररोज लोकांना अन्नाचे वितरण करण्याचे काम करत आहे.