अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन यांचा विवाहसोहळा 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीत पार पडला. त्यानंतर दोघांनी भारतात येऊन आधी दीपिकाच्या घरी बंगळुरुला मग मुंबईत रिसेप्शन आयोजित केलं होतं. त्यानंतर आता दोघे देवदर्शन करत आहेत. दीपिका आणि रणवीरने आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.यावेळी दीपवीरला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. रणवीर-दीपिकाही चाहत्यांना फोटोसाठी पोज देत होता. पाहा आणखी फोटो –