कोडवा परंपरेनुसार रश्मिका-विजयचा लग्नसोहळा; कशी असते ही विवाहपद्धती?

रश्मिका आणि विजय यांचा लग्नसोहळा कोडवा परंपरेनुसार पार पडल्याचं म्हटलं जात आहे. ही परंपरा सर्वसामान्य हिंदू विवाहपद्धतीपेक्षा किती वेगळी असते, त्याविषयी जाणून घ्या..

| Updated on: Mar 01, 2026 | 4:18 PM
1 / 5
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं. या दोघांनी कोडवा परंपरेनुसार लग्न केलं. रश्मिका ही मूळची कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील (कुर्ग) विराजपेटा इथली आहे. तिचं शिक्षणसुद्धा कुर्गमध्येच पार पडलं.

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं. या दोघांनी कोडवा परंपरेनुसार लग्न केलं. रश्मिका ही मूळची कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील (कुर्ग) विराजपेटा इथली आहे. तिचं शिक्षणसुद्धा कुर्गमध्येच पार पडलं.

2 / 5

मीडिया रिपोर्ट्सनुसार रश्मिका आणि विजयचं लग्न सर्वसामान्य हिंदू विवाहपद्धतीसोबतच कोडवा परंपरेनुसारही पार पडलं. सर्वसामान्यपणे कर्नाटकातील कोडागु (कुर्ग) क्षेत्रात कोडवा परंपरेनुसार लग्न पार पडतं. ही विवाहपद्धती हिंदू विवाहपद्धतीपेक्षा बरीच वेगळी असते.

3 / 5

हिंदू विवाहपद्धतीत पंडितांकडून मंत्रोच्चार, गळ्यात मंगळसूत्र बांधणं, अक्षता टाकणं आणि इतर काही वैदिक विधी असतात. परंतु कोडवा परंपरेत पंडित नसतात. घरातील मोठी व्यक्तीच विवाह पार पाडतात. त्यासाठी विवाह मंडपात एक दिवा लावला जातो. त्याचसोबत पित्रांची पूजा केली जाते.

4 / 5

सर्वसाधारणपणे दोन दिवस हा लग्नसोहळा चालतो. पहिल्या दिवशी मंडप आणि तयारी केली जाते. वर आणि वधू त्यांच्या कुटुंबीयांसह विवाहस्थळी पोहोचतात. तिथे लग्नाचा मंडप लावला जातो. आंबा, केळीची पानं आणि फणसाच्या फांद्यांनी मंडप सजवलं जातं.

5 / 5

या विवाहपद्धतीच्या दुसऱ्या दिवसाला मंगळा असं म्हणतात. पारंपरिक पोशाखात वर मंडपात पोहोचतो आणि त्याच्या हातात तलवार असते. सोशल मीडियावरील फोटोमध्ये विजयच्या हातात तलवार आणि सोनेरी कमरबंद पहायला मिळाला. लग्नमंडपात वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर वर आणि वधू एकमेकांच्या गळ्यात फुलांचा हार घालतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us