‘या’ रिअल लाईफ जोड्यांनी बिग बॉसमध्ये थाटला संसार

बिग बॉसच्या 14 व्या सीजनमधील अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक या जोडीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. परंतु रुबीना आणि अभिनवची ही जोडी बिग बॉसच्या घरात जाणारी पहिली जोडी नाही. यापूर्वीदेखील अनेक जोड्या बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाल्या आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:37 AM, 5 Oct 2020
बिग बॉसच्या 14 व्या सीजनमधील अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक या जोडीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. असे म्हटले जात आहे की, या दोघांनी जोडीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्याने त्यांना फायदा होईल. परंतु रुबीना आणि अभिनवची ही जोडी बिग बॉसच्या घरात जाणारी पहिली जोडी नाही. यापूर्वीदेखील अनेक जोड्या बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाल्या आहेत.
कीथ सिकेरा आणि रोशेल राव : किथ आणि रोशेलची जोडीदेखील खूप प्रसिद्ध झाली होती. या जोडीने बिग बॉसच्या नवव्या सीजनमध्ये सहभाग घेतला होता. ते अगोदरपासून एकमेकांना डेट करत होते. बिग बॉसच्या घरात त्यांचं नातं अधिकच मजबूत झालं. त्यामुळे या जोडीला खूप प्रसिद्धी मिळाली होती.
डेलनाज इराणी आणि राजीव पॉल : बिग बॉसच्या सहाव्या सीजनमध्ये डेलनाज आणि राजीवची जोडी पाहायला मिळाली होती.
बख्तियार आणि तनाज इराणी : बिग बॉसच्या घरात तनाज आणि बख्तियारची जोडी पाहायला मिळाली होती. या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. परंतु बिग बॉसच्या घरात असताना दोघे अनेकदा भांडले आहेत.
अपूर्व अग्निहोत्री आणि शिल्पा सकलानी : बिग बॉसच्या सातव्या सीजनमध्ये शिल्पा आणि अपूर्वची जोडी पाहायला मिळाली होती. शिल्पा खूप फटकळ होती तर राजीव शांत स्वभावाचा असल्याचे पाहायला मिळाले. ही जोडी लोकांना फार आवडली नाही.