क्रिकेटपटू नितीश राणा या खेळाडूचं नाव यशस्वी खेळाडूंमध्ये घेतलं जातं. तो आतापर्यंत टीम इंडियासाठी जरी खेळला नसला तरी आयपीएलपासून इतर स्पर्धांमध्ये त्याचा जलवा आपल्याला बघायला मिळाला आहे. नितीश क्रिकेटमध्ये जितका यशस्वी आहे तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी ठरला आहे. नितीशचं करिअर जसं यशस्वी आहे तसंच त्याची प्रेम कहाणी देखील यशस्वी आहे. नितीशचा जीव साची मारवाह नावाच्या तरुणीवर भाळला होता. दोघांमध्ये प्रेम झालं नंतर त्यांचं लग्न झालं. दोघं पती-पत्नी खूप आनंदात आहेत. खरंतर त्यांची प्रेमकहाणी देखील रोमांचक आहे.
1 / 5
नितीश आणि साची यांनी लग्न करण्याआधी जवळपास साडेतीन वर्ष एकमेकांना डेट केलं. नितीशने एका मुलाखती दरम्यान साची सोबत कशी भेट झाली याबाबत माहिती दिली होती. नितीशचा भाऊ आणि साचीचा भाऊ फुटबॉल खेळायचे. तेव्हा साची तिथे खेळ बघायला यायची. क्रिकेटमधून ब्रेक मिळाल्यानंतर नितीशही फुटबॉल खेळायला जायचा. तिथूनच त्यांच्यात भेटीगाठी व्हायला सुरुवात झाली, असं त्याने मुलाखतीत सांगितलं होतं.
2 / 5
नितीश आणि साची 2016 मध्ये लग्न करण्याचं ठरवलं होतं. तेव्हापासून त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. अखेर 19 फेब्रुवारी 2019 रोजी ते लग्नबेडीत अडकले. साची ही नितीश पेक्षा दिड वर्षांनी मोठी आहे, असं नितीशने स्वत: सांगितलं होतं. मी साचीच्या प्रेमात इतका आकांत बुडोले की वयाचं लक्षात आलंच नाही, असं नितीश म्हणाला होता.
3 / 5
दोघांच्या प्रोफेशनबद्दल बोलायचं झालं तर नितीश हा क्रिकेटर आहे जे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. तर साची ही इंटेरिअर डिझायनर आहे. साचीने 2015 सालापासून इंटेरियअर डिझायर म्हणून आपलं करिअर सुरु केलं आहे. साचीने आपल्या क्षेत्रात चांगलं यश संपादित केलं आहे. ती साची राणा डिझाईन स्टुडियोची संस्थापक आहे.
4 / 5
आयपीएलच्या सामन्यांदरम्यान साचीला अनेकवेळा स्टेडियममध्ये आपण बघितलं असेल. गेल्यावर्षी साचीच्या वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हा नितीशने आयपीएलमध्ये सुरिंदर नावाची जर्सी दाखवून श्रद्धांजली अर्पण केली होती. साची-नितीश एकमेकांना आपापल्या क्षेत्रात मदतही करतात.