PHOTO : नीरज चोप्राने घातलं एक लाखाचं स्वेटशर्ट, पीव्ही सिंधू, मीराबाई आणि लवलीनानेही केलं ग्लॅमरस फोटोशूट

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने यंदा 7 पदकांवर नाव कोरलं. यामध्ये एका सुवर्णपदकासह दोन रौप्य तर चार कांस्यपदकांचा समावेश आहे. मेहनतीच्या जोरावर पदक जिकणारे भारताचे पदकविजेते आता मात्र ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत.

1/4
टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला पदक जिंकवून देणारे खेळाडू आता सर्वत्र स्वत:ची हवा करत आहेत. अनेकजण विविध ब्रँड्सचे अम्बॅसिडर झाले आहेत. दरम्यान रौप्यपदक विजेती मीराबाई चानूदेखील (Meerabai Chanu) प्रसिद्ध मासिक वोगमध्ये (Vogue) झळकली असून ती अगदी वेगळ्या रुपात दिसत आहे.

2/4
मीराबाईसोबत बॉक्सर लवलीना (Lovlina) ही वोगच्या फोटोशूटमध्ये दिसली. तिने बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. तिचा नवा लूकही लोकांना फार  आवडत आहे.

3/4
वोगच्याच मासिकात बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूही (PV Sindhu) दिसत आहे. सिंधूनेही यंदा कांस्य पदक मिळवत भारताचं नाव मोठं केलं.

4/4
भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा तर पदक जिंकल्याच्या दिवसापासून सर्वत्र झळकत आहे. विविध रिएलिटी शो, जाहिरात यानंतर आता तो एका फोटोशूटमध्येही झळकला. विशेष म्हणजे यावेळी त्याने  लुई वितों या कंपनीचं  स्वेटशर्ट घातलं होतं. ज्याची किंमत जवळपास एक लाख रुपये इतकी होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI