AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : पाच संघाच्या सहा कर्णधारांना बसला फटका, या चुकीमुळे नको ते झालं

आयपीएल 2025 स्पर्धेत पाच संघांच्या सहा कर्णधारांना नियम मोडल्याने फटका बसला आहे. ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला आणि त्याचा फटका कर्णधारांना बसला. सहा कर्णधारांना 12 लाख रुपयांचा दंड बसला आहे. हीच चूक दुसऱ्यांदा केली तर 24 लाखांचा दंड बसला आहे.

| Updated on: Apr 14, 2025 | 4:24 PM
Share
आयपीएल स्पर्धेच्या 18व्या पर्वात पाच संघाच्या सहा कर्णधारांना दंड ठोठावण्यात आला आहे. या सहा कर्णधारांना स्लो ओव्हर रेटची चूक भोवली आहे. आयपीएल नियमानुसार, प्रत्येक संघाला 1 तास 30 मिनिटात 20 षटकं पूर्ण करायची आहेत. जर 20 षटकं वेळेत पूर्ण केली नाहीत तर संघाच्या कर्णधाराला दंड आकारला जातो. प्रत्येकी 12 लाखांचा दंड आहे.

1 / 8
 राजस्थान रॉयल्स संघाचे सुरुवातीच्या सामन्यांचे नेतृत्व रियान परागने केलं. त्यानंतर आता संजू सॅमसनकडे धुरा आहे. दोघांनीही स्लो ओव्हर रेटची चूक केली. त्यामुळे पाच संघांमधील एकूण सहा कर्णधारांना दंड बसला आहे. चला जाणून घेऊयात दंड भरणारे कर्णधार कोण होते.

2 / 8
अक्षर पटेल: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने निर्धारित वेळेत 20 षटके पूर्ण केली नाहीत. या चुकीमुळे कर्णधार अक्षर पटेलला 12 लाखांचा दंड ठोठावला.

3 / 8
हार्दिक पंड्या: 30 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने संथ गतीने गोलंदाजी केली होती.

4 / 8
रियान पराग: संजू सॅमसनच्या जागी राजस्थान रॉयल्सचे तीन सामन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या रियान परागलाही दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर-रेट चूक केल्याबद्दल परागला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

5 / 8
ऋषभ पंत: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतलाही दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात निर्धारित वेळेत 20  षटके पूर्ण न केल्याबद्दल पंतला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

6 / 8
रजत पाटिदार: मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या वेळेत 20 षटके पूर्ण केली नाहीत. त्यामुळे आरसीबी संघाचा कर्णधार रजत पाटिदारला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

7 / 8
संजू सॅमसन: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातही संजू सॅमसनने दिलेल्या वेळेत 20  षटके पूर्ण केली नाहीत. पण संजू सॅमसनला 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. रियान परागच्या नेतृत्वाखाली एकदा चूक झाली होती. त्यामुळे दुसऱ्यांदा चूक झाल्याने 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

8 / 8
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.