AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana : एका शतकासह असंख्य विक्रम, स्मृती मंधानाचा कारनामा

Smriti Mandhana Cenutry Records : भारतीय महिला संघाची कर्णधार स्मृती मंधाना हीने इंग्लंड दौऱ्यात टी 20i मालिकेतील सलामीच्या सामन्यात शतक ठोकलं. स्मृतीने या ऐतिहासिक शतकासह भारताला विजयी करण्यात निर्णायक भूमिका बजावली.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 29, 2025 | 5:12 PM
Share
वूमन्स टीम इंडियाची कर्णधार स्मृती मंधाना हीने मेन्स टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल याच्याप्रमाणेच इंग्लंड दौऱ्याची सुरुवात शतकाने केली. स्मृतीने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात 28 जून रोजी  खणखणीत शतक ठोकलं. स्मृतीने ट्रेंटब्रिजमध्ये 112 धावांची झंझावाती खेळी केली. स्मृती यासह टीम इंडियाकडून टी 20i क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्या करणारी पहिली माहिला फलंदाज ठरली (Photo Credit : Getty Images)

1 / 5
स्मृतीने या सामन्यात 51 चेंडूत शतक पूर्ण केलं. स्मृतीचं हे टी 20i कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठरलं. स्मृती यासह वूमन्स टीम इंडियाकडून टी 20i शतक करणारी दुसरी फलंदाज ठरली. याआधी हरमनप्रीत कौर हीने 2018 साली 103 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Bcci X Account)

2 / 5
मंधानाने या शतकासह ऐतिहासिक कामगिरी केली. मंधानाने टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारी पहिली महिला फलंदाज हा बहुमान मिळवला. मंधानने याआधी वनडेत 11 तर कसोटीत 2 शतकं केली आहेत.  तसेच स्मृती तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारी पाचवी महिला ठरली आहे. (Photo Credit : Bcci X Account)

3 / 5
तसेच स्मृती ट्रेंट ब्रिजमध्ये शतक करणारी पहिली महिला तर एकूण दुसरी भारतीय क्रिकेटपटू ठरली. स्मृतीआधी याच मैदानात टी 20i संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने 2022 साली शतक झळकावलं होतं. सूर्याने तेव्हा 117 धावांच खेळी केली होती. (Photo Credit : Bcci X Account)

4 / 5
स्मृतीने या खेळी दरम्यान 15 चौकार आणि 3 षटकार लगावले. स्मृती यासह एका टी 20i सामन्यात सर्वाधिक 18 फटके लगावणारी पहिली भारतीय फंलदाज ठरली.  स्मृतीनी हरमनप्रीत कौर हीचा (15)  रेकॉर्ड ब्रेक  केला. (Photo Credit : Bcci X Account)

5 / 5
Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा