चंद्रपूरच्या ताडोबामधील बफर भागात जनाबाई वाघीण आपल्या बछड्यांना दुध पाजताना पर्यावरण प्रेमींना दिसली आहे. जनाबाई तिच्या पराक्रमांनीही प्रसिद्ध आहे. मात्र, तिच्या मायेची प्रचिती पर्यावरण प्रेमींना नुकतीच आलीय. चिमूर तालुक्यातील मदनापूर बफर क्षेत्रातील प्रसिद्ध वाघीण म्हणून जनाबाईला ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच तिने एका ढाण्या वाघाला लक्ष्य केलं होतं. यावेळी तिने आपल्या बछड्यांना या वाघाच्या तावडीतून वाचवलं होतं.
चंद्रपूरच्या ताडोबामधील बफर भागात जनाबाई वाघीण आपल्या बछड्यांना दुध पाजताना पर्यावरण प्रेमींना दिसली आहे. जनाबाई तिच्या पराक्रमांनीही प्रसिद्ध आहे. मात्र, तिच्या मायेची प्रचिती पर्यावरण प्रेमींना नुकतीच आलीय.
1 / 5
चिमूर तालुक्यातील मदनापूर बफर क्षेत्रातील प्रसिद्ध वाघीण म्हणून जनाबाईला ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच तिने एका ढाण्या वाघाला लक्ष्य केलं होतं. यावेळी तिने आपल्या बछड्यांना या वाघाच्या तावडीतून वाचवलं होतं.
2 / 5
वाघीण किंवा वाघ म्हटलं की दहशत वालीच. पण, जनाबाई आपल्या बच्छड्यांसोबत निवांत वेळ घालवताना दिसून आली. तिने तिच्या बच्छड्यांना दुध पाजलं. यावेळी ती त्यांच्यासोबत खेळतानाही पर्यावरण प्रेमींना दिसून आली.
3 / 5
सध्या वाघ सफारी हंगाम असताना जनाबाई सातत्याने पर्यटकांना दर्शन देत आहे. याच परिसरात एक ढाण्या वाघ आला होता. या ढाण्या वाघाला जनाबाईने परतावून लावलं. यावेळी तिने आपल्या बच्छड्यांची सुखरुप सुटका केली.
4 / 5
जनाबाई ताडोबामध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. या जनाबाईचे वाघीणीचे अनेक किस्से ताडोबामध्ये आहे. ती सध्या राहत असलेल्या बफर भागात कोणत्याही वाघाला साधं फिरकूही देत नाही.