कधीही भालाफेकीच्याच गप्पा, पैसे आणि बक्षीसांचं देणंघेणं नाही, कसा आहे नीरजचा स्वभाव?, जिगरी दोस्ताने सांगितला!

भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकवून देत संपूर्ण देशाचा लाडका झालेल्या नीरजबद्दल त्याच्या खास मित्राने काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

1/5
भारताचा भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) विजयाचा उत्सव संपूर्ण देश साजरा करत आहे. यावेळी नीरजचा खास मित्र तर थेट नीरजच्या विजयानंतर थेट पुश अप्स करुन आनंद साजरा करु लागला. मागील सहा वर्षांपासून नीरज सोबत असणारा त्याचा हा मित्र त्याच्या अडचणीच्या काळानंतर आता नीरजंच्या य़शातही सहभागी झाला आहे.

2/5
नीरजच्या या खास मित्राचं नाव आहे तेजस्विन शंकर. भारताकडून लांब उडी खेळणाऱ्या तेजस्विनची नीरजची पहिली भेट 2015 मध्ये झाली होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी साउथ  एशियन गेम्समध्ये दोघेही सर्वात तरुण खेळाडू असल्याने एकत्रच वेळ घालवू लागले आणि तेथून त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली.

3/5
तेजस्विन शंकरने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत सांगितले की, ''नीरजसाठी पैसा आणि पुरस्कार जास्त महत्त्वाचं नसून त्याला फक्त भालाफेक खेळायला खूप आवडतं. तो कायम भालाफेकीबद्दलच बोलत असतो. त्याची हीच गोष्ट मला फार आवडते.''

4/5
तेजस्विन नीरजचं सोशल मीडिया देखील हँडल करतो. जेव्हाही नीरजला मुली मेसेज करतात, तेव्हा तेजस्विन
त्यांना रिप्लाय देतो. नीरजला या सर्वात काही इंटरेस्ट नसल्याचं तेजस्विनने सांगितलं. तसंच नीरज त्याची रुम खूप
अस्ताव्यस्त ठेवतो. त्यामुळे त्याच्यासोबत राहताना फार अडचण होते. तरी देखील त्याचीच सोबत आवडत असल्याचंही 
तेजस्विनने सांगितलं.
तेजस्विन नीरजचं सोशल मीडिया देखील हँडल करतो. जेव्हाही नीरजला मुली मेसेज करतात, तेव्हा तेजस्विन त्यांना रिप्लाय देतो. नीरजला या सर्वात काही इंटरेस्ट नसल्याचं तेजस्विनने सांगितलं. तसंच नीरज त्याची रुम खूप अस्ताव्यस्त ठेवतो. त्यामुळे त्याच्यासोबत राहताना फार अडचण होते. तरी देखील त्याचीच सोबत आवडत असल्याचंही तेजस्विनने सांगितलं.
5/5
नीरजने सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याने  तेजस्विनला फोन करताच तो कमालीचा भावूक झाला.
 त्याने खूप प्रयत्न करुन आपले आनंदाश्रू रोखले, असल्याचंही तेजस्विनने सांगितलं.
नीरजने सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याने तेजस्विनला फोन करताच तो कमालीचा भावूक झाला. त्याने खूप प्रयत्न करुन आपले आनंदाश्रू रोखले, असल्याचंही तेजस्विनने सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI