AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, अभिनेत्रीला मिळाली शिक्षा; लग्नाआधी बॉयफ्रेंडने तोडले सर्व संबंध

'आश्रम' या वेब सीरिजमध्ये अभिनेता बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स देणाऱ्या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की या सीरिजनंतर तिचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला होता. त्याने निर्मात्यांशी बोलून अनेक सीन्स बदलायला लावले होते.

| Updated on: Jul 01, 2026 | 12:41 PM
Share
अभिनेत्री त्रिधा चौधरी ही टेलिव्हिजन, भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांमध्ये लोकप्रिय आहे. मालिका, ओटीटी आणि चित्रपट अशा तिन्ही प्लॅटफॉर्म्सवर तिने काम केलं आहे. मात्र तिला सर्वाधिक ओळख ही प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या वेब सीरिजमुळे मिळाली. या सीरिजमध्ये तिने बबीबा भाभीची भूमिका साकारली होती. याच सीरिजमध्ये त्रिधा आणि बॉबी देओलचे बरेच इंटिमेट सीन्स होते.

1 / 6
बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स देऊन चर्चेत आलेल्या त्रिधा चौधरीला वैयक्तिक आयुष्यात मात्र मोठं नुकसान झेलावं लागलं. सीरिजमधील या भूमिकेमुळे तिचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्रिधा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

2 / 6
'अल्फा टॉक्स' या पॉडकास्ट मुलाखतीत त्रिधा म्हणाली, "जेव्हा मी आश्रम या वेब सीरिजमध्ये काम करत होते, तेव्हा माझ्या बॉयफ्रेंडने निर्मात्यांशी बोलून अनेक सीन्स बदलायला लावले होते. शूटिंगदरम्यान माझा बॉयफ्रेंड प्रकाश झा सरांकडे गेलो होता. त्याने माझे अनेक सीन्स पुन्हा लिहून घेतले आणि त्यात बदल करायला सांगितले. मी या मुलीशी लग्न करणार आहे, त्यामुळे तिचे असे सीन्स ठेवू नका, असं त्याने सरांना म्हटलं होतं."

3 / 6
"खरंतर सीरिजमध्ये तितके बोल्ड सीन्स नव्हतेच, जितके त्यात सांगण्यात आले होते. मात्र तरीही वेब सीरिजनंतर माझं त्याच्याशी ब्रेकअप झालं. असो.. आयुष्य थांबत नाही. फक्त एवढंच दु:ख आहे की आयुष्याच्या कठीण काळात तो माझ्यासोबत नव्हता. राहता राहिला प्रश्न इंटिमेट सीन्सचा, तर असे सीन्स कथेच्या मागणीनुसारच असतात. त्यांचं खऱ्या आयुष्याशी काहीच देणं-घेणं नसतं", अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

4 / 6
आणखी एका पॉडकास्ट मुलाखतीतही त्रिधा तिच्या आणि बॉबी देओलच्या इंटिमेट सीन्सबद्दल  मोकळेपणे व्यक्त झाली होती. असे सीन्स शूट करताना सेटवर किती लोक उपस्थित असतात, असा प्रश्न विचारला असता त्रिधा हसली. याविषयी ती पुढे म्हणाली, "पडद्यावर तुम्ही पाहत असाल की दोघं एकमेकांना मिठी मारत आहेत, किस करत आहेत. मात्र पडद्यामागे त्यांच्यात खूप मजा-मस्ती सुरू असते. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत."

5 / 6
"अभिनेत्री म्हणून तुमच्याकडे आता इतके हक्क असतात की तुम्ही दिग्दर्शकांना आणि सहकलाकारांना स्पष्टपणे काही गोष्टी सांगू शकता. किसिंगचा सीन असेल तर फक्त तेवढंच असलं पाहिजे. जर मिठी मारायचा सीन असेल तर त्यापुढे काहीच झालं नाही पाहिजे. जर मर्यादा ओलांडल्यासारखं जाणवलं तर तुम्ही लगेच कट म्हणू शकता. जर दोन लोकांमध्ये समजूतदारपणा असेल तर इंटिमेट सीन्स करणं कठीण नसतं", असंही तिने स्पष्ट केलं.

6 / 6
Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू