Sneezing Problem: ‘या’ घरगुती उपायांनी एका दिवसात बरी करा सर्दी

मानसी मांडे,  Tv9 मराठी

Updated on: Dec 09, 2022 | 11:49 AM

Dec 09, 2022 | 11:49 AM
उन्हाळा असो किंवा हिवाळा, एकदा सर्दी झाली की ती बराच काळ त्रास देते. सटासट येणाऱ्या शिंका , कधी सतत वाहणारे किंवा मध्येच चोंदलेले नाक, त्यामुळे होणारी डोकेदुखी यामुळे आपण हैराण होतो. त्यापासून सुटका करण्यासाठी औषधांशिवाय पर्याय नसतो. मात्र काही असे घरगुती उपाय आहेत, ज्याद्वारे तुमची सर्दी सहज बरी होईल आणि लवकर बरं वाटू शकेल.

1 / 5
लवंग आणि मध - तुम्ही मध आणि लवंग यांचा वापर करून सर्दीचा त्रास दूर करू शकता. त्यासाठी एका तव्यावर लवंग भाजून घ्यावी आणि तिची पूड करून मधात मिसळावी. हे चाटण दिवसभरात 3-4 वेळा खावे.

2 / 5
हर्बल टी - तुळशीची पाने, आलं, मुलेठीसह काही औषधी वनस्पतींचा चहा किंवा काढा यांचे सेवन करावे. हे दिवसभरात 3-4 प्यायल्यास आराम मिळू शकेल. सर्दीचा त्रास नसेल तरी थंडीच्या दिवसातही तुम्ही हा हर्बल टी पिऊ शकता.

3 / 5
वाफ घेणे - हा एक असा देशी उपाय आहे, जो करण्याचा सल्ला डॉक्टरही देतात.  तुम्ही साधी वाफ किंवा हर्बल पद्धतीनेही वाफ घेऊ शकता.त्यासाठी पाण्यात कडुनिंबाची पाने किंवा हळद घालून पाणी गरम करावे आणि वाफ घ्यावी.

4 / 5
गुळण्या करणे - एखादा संसर्ग किंवा ॲलर्जीमुळेही सर्दीचा त्रास होऊ शकतो. गळ्यातील इन्फेक्शनमुळेही सर्दी वाढऊ शकते. अशा परिस्थितीत कोमट अथवा कढत पाण्यामध्ये मीठ टाकून त्याने गुळण्या कराव्यात. या उपायाने लगेच आराम मिळू शकतो.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI