AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vishal Dadlani: फार्महाऊस असावं तर असं.. विशाल ददलानीचं पुण्याजवळ डोंगर-तलावाच्या कुशीत आलिशान घर

Vishal Dadlani: एकीकडे डोंगर-तलावाचं अप्रतिम दृश्य, तर दुसरीकडे संगीतासाठी खास जागा आणि आरामदायी इंटेरिअर—विशाल ददलानीचं हे फार्महाऊस त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळीच झलक दाखवतं.

| Updated on: Sep 09, 2026 | 8:55 AM
Share
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानीच्या पुण्याजवळील फार्महाऊसची सध्या चांगलीच चर्चा आहे. दिग्दर्शिका फराह खानने तिच्या युट्यूब व्लॉगमधून विशालच्या या खास घराची झलक दाखवली आणि त्यानंतर या फार्महाऊसच्या इंटेरिअरपासून निसर्गरम्य लोकेशनपर्यंत अनेक गोष्टी सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.

1 / 8
विशेष म्हणजे, हे घर केवळ आलिशान नसून विशालच्या संगीतप्रेमाचीही झलक त्यातून पाहायला मिळते. विशालने हे दोन मजली फार्महाऊस ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या कामानंतर घेतल्याचं सांगितलं आहे. 2010 ते 2013 या काळात या घराचं बांधकाम करण्यात आलं.

2 / 8
घराची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याच्या आजूबाजूचा निसर्ग. घरातून डोंगर आणि तलावाचं मनमोहक दृश्य दिसतं. अगदी किचनचा अपवाद वगळता जवळपास प्रत्येक भागातून निसर्गाचा आनंद घेता येतो.

3 / 8
विशालच्या फार्महाऊसमध्ये प्रशस्त बॅकयार्ड असून त्यात सुंदर स्विमिंग पूल आहे. घराभोवती हिरवळ, मोठी झाडं आणि बोगनवेलची झाडं दिसतात. त्यामुळे या जागेला एक शांत, निवांत आणि रिसॉर्टसारखा लूक मिळतो.

4 / 8
घरातील लिव्हिंग रूमही खास पद्धतीने सजवण्यात आली आहे. ती वरच्या मजल्यावर असून तिथे मोठा सोफा आणि दगडी भिंतींचा आकर्षक वापर करण्यात आला आहे. घराच्या दोन्ही मजल्यांवर स्टोन-क्लॅड भिंती दिसतात. लाकडी फर्निचर आणि जिन्यांमुळे घराच्या इंटेरिअरला वेगळा टच मिळतो.

5 / 8
या घरातील आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे इनडोअरसोबतच आउटडोअर जिना. पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून हा जिना थेट पूलच्या भागात येतो. पूलजवळील जागेत पॅटिओ स्टाइल फर्निचर ठेवण्यात आलं असून संपूर्ण परिसराला बीच-हाऊससारखा आरामदायी लूक देण्यात आला आहे.

6 / 8
विशालने त्याच्या फार्महाऊसमध्ये होम म्युझिक स्टुडिओ तयार केला आहे. या स्टुडिओमध्ये स्पीकर्स, संगीताशी संबंधित उपकरणं आणि पोस्टर्स पाहायला मिळतात. मात्र या स्टुडिओचं सेटअप अद्याप पूर्ण झालेलं नसल्याचंही समोर आलं.

7 / 8
विशालच्या संगीतप्रेमाची खास झलक इथे दिसते. त्याच्याकडे मायकेल जॅक्सनच्या ‘Thriller’ अल्बमची स्वाक्षरी केलेली प्रत असून ती त्याने लिलावातून विकत घेतली आहे. याशिवाय फराह खान आणि शाहरुख खान यांच्या स्वाक्षरी असलेलं ‘ओम शांती ओम’चं पोस्टरही घरात पाहायला मिळतं.

8 / 8
Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरलं
मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर...
Latur | मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर नेमकं काय घडलं?
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात