घरात अचानक मोठ्या प्रमाणात मुंग्या दिसणं ही सामान्य बाब असल्याचं बोललं जातं. पण ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रात याचे काही संकेत आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
1 / 5
ज्योतिषशास्त्रानुसार घरात काळ्या रंगाच्या मुंग्या दिसणं हे शुभ मानलं जातं. अशा मुंग्या दिसणं हे सुख आणि समृद्धीचं येणार असल्याचे संकेत आहेत, असे बोलले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
2 / 5
तर घरात अचानकपणे लाल रंगाच्या मुग्या दिसणे अशुभ मानले जाते. लाल रंगाच्या मुंग्या दिसल्या तर आर्थिक नुकसान होण्याचे, डोक्यावर कर्ज होण्याचे किंवा वादविवाद होण्याचे संकेत असल्याचे बोलले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
3 / 5
मुंग्या कोण्तया दिशेने निघाल्या आहेत, यालाही वेगळे महत्त्व आहे. उत्तर दिशेने येणाऱ्या मुंग्या हे सुख तर दक्षिण दिशेने येणाऱ्या मुंग्या लाभ, पश्चिम दिशेने येणाऱ्या मुंग्या यात्रा घडून येणार असल्याचे संकेत देतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
4 / 5
भात असलेल्या भांड्यात काळ्या काळ्या मुंग्या दिसल्या की संपत्तीत भर पडते असे मानले जाते. सोन्याच्या दागिन्यांवर मुंग्या झाल्या तर सोन्यात वाढ होण्याचे किंवा संपत्तीत वाढ होण्याचे संकेत मिळाले असे समजले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय) (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)