…अन्यथा सुजय विखे यांची महिला आयोगाकडे तक्रार करु : अभिनेत्री दीपाली सय्यद

खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी माफी मागावी अन्यथा महिला आयोगाकडे तक्रार करु, असा इशारा अभिनेत्री दीपाली सय्यद (Actrees Deepali Sayyed) यांनी दिला आहे़.

...अन्यथा सुजय विखे यांची महिला आयोगाकडे तक्रार करु : अभिनेत्री दीपाली सय्यद

अहमदनगर : खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी माफी मागावी अन्यथा महिला आयोगाकडे तक्रार करु, असा इशारा अभिनेत्री दीपाली सय्यद (Actrees Deepali Sayyed) यांनी दिला आहे़. अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. नगर तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) पाटली यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे, असा आरोप मिहलांकडून करण्यात येत आहे.

‘तुमच्याकडे देखणा माणूस आला तर त्याला फक्त पाहायला जात जा़, साकळाई योजना फक्त सुजय विखेच करु शकतो अन्य कोणाचे ते काम नाही’ असं नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात सुजय विखे म्हणाले होते. विखेंच्या या वक्तव्याबाबत दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत विखेंबाबत संताप व्यक्त केला.

साकळाई योजना लवकरात लवकर सुरु करावी यासाठी दिपाली सय्यद यांनी आमरण उपोषण केलं होते. अहमदनगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी यासाठी मागील मोठ्या काळापासून अभिनेत्री दीपाली सय्यद पाठपुरावा करत आहेत.

साकळाई योजनेतून अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी साकळाई योजनेतून 3 टीएमसी पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र, मागील 20 वर्षांपासून येथील लोकप्रतिनिधी या योजनेच्या माध्यमातून फक्त राजकारणच करत आहेत.


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI