VIDEO : आदित्य लहान भावासारखा, देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा (sanjay dutt support aaditya thackeray) दिला आहे.

VIDEO : आदित्य लहान भावासारखा, देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा (sanjay dutt support aaditya thackeray) दिला आहे. संजय दत्तने नुकतंच एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. यात त्याने आदित्य ठाकरेंना भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

येत्या 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीत आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्याला मोठ्या प्रमाणात मतदान करा, असे आवाहन संजय दत्तने केलं आहे.

“आदित्यला माझ्या शुभेच्छा. येत्या विधानसभेला तो मोठ्या मतधिक्याने जिंकेल” असा विश्वासही संजय दत्तने व्यक्त केला. “आपल्या देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज आहे”, असं सांगत संजय दत्तने आदित्य ठाकरेंची पाठराखण (sanjay dutt support aaditya thackeray) केली.

“आदित्य ठाकरे हा माझ्या लहान भावासारखा आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप मदत केली आहे. ते माझ्या पित्यासमान आहे. त्यांनी मला केलेली मदत मी कधीही विसरु शकत नाही,” असेही संजय दत्त म्हणाला.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय दत्त याने अनेक नेत्यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी संजय दत्तने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. दरम्यान संजय दत्तने यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षात जाण्यास नकार दिला आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI