बारामतीचा निकाल लागताच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सर्वात मोठी बातमी; जय पवारांनी थेट सांगून टाकलं…राजकारणात खळबळ!
जय पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणावर भाष्य केले आहे. या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळेय यांनीही विलिनीकरणावर भाष्य केले होते.

Jay Pawar On NCP Merging : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चितच होता. फक्त अधिकृत निकालाची प्रतीक्षा होती. अपेक्षेप्रमाणेच आता निकाल लागला आहे. दरम्यान, आता या विजयानंतर सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद सादला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आगामी वाटचालीवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. सोबतच त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणावरही भाष्य केलं. त्यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुनेत्रा पवार यांनीही विलिनीकरणाची चर्चा सध्या थांबलेली आहे, असे विधान केले होते.
जय पवार नेमकं काय म्हणाले?
दिवंगत नेते अजित पवार यांच्यासाठी सर्वांनीच ही निवडणूक स्वत:च्या हातात घेतली. अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी यांना सर्वांनीच आधार दिला आहे, असे मत जय पवार यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाचा आधार घेत विलिनीकरणावरही विचारलं. निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादींची वाटचाल कशी असेल? असंही त्यांना विचारण्यात आलं. यावर बोलताना, दोन्ही राष्ट्रवादीच्या वाटचालीबद्दल किंवा विलिनीकरणाबद्दल मी एकटा ठरवू शकत नाही. विलिनीकर दोन्ही पक्षांचे होणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी विलिनीकरणाबाबत काही ठरवलं किंवा तशी चर्चा केली, तर त्यावेळी चित्र वेगळे असू शकते, असे सूचक विधान जय पवार यांनी केले.
राहुरीमध्ये कोणाचा विजय?
तसेच, यावेळी त्यांनी दर गुरुवारी बारामती येथे आम्ही जनता दरबार घेणार आहोत, असे जय पावर म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर त्यांनी सर्व बारामतीकरांचे आभार मानले. तसेच आगामी काळात बारामतीच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नरत राहू असेही जय पवार म्हणाले. दरम्यान, बारामती या मतदारसंघासोबतच राहुरी या विधानसभा मतदारसंघासाठीही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या मतदारसंघातून अक्षय कर्डिले यांचा विजय झाला आहे.
