AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! एमआयएमला आणखी एका आघाडीकडून नो एन्ट्री; आता ओवैसी काय भूमिका घेणार?

बच्चू कडू आज निफाड येथे शेतकरी मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी आले होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी 150 किलोचा हार आणण्यात आला होता. क्रेनच्या सहाय्याने त्यांना हार घालण्यात आला. तसेच बच्चू कडू यांच्यावर फुलांची उधळणही करण्यात आली. यावेळी बच्चू कडू यांनी प्रहारची निवडणूक निशाणी असलेली हातातील बॅच उंचावून नागरिकांना अभिवादन केलं.

सर्वात मोठी बातमी ! एमआयएमला आणखी एका आघाडीकडून नो एन्ट्री; आता ओवैसी काय भूमिका घेणार?
Asaduddin OwaisiImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 18, 2024 | 7:03 PM
Share

महाविकास आघाडीने एमआयएमला सोबत घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एमआयएम राजू शेट्टी, छत्रपती संभाजी राजे आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा हवेत विरली आहे. तिसऱ्या आघाडानेही एमआयएमला झिडकारलं आहे. एमआयएमला तिसऱ्या आघाडीत नो एन्ट्री करण्यात आली आहे. तिसऱ्या आघाडीचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज ही माहिती दिली. बच्चू कडू नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

बच्चू कडू हे नाशिकमध्ये आले असता त्यांना एमआयएमला तिसऱ्या आघाडीत घेणार का? असा सवाल करण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे. तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एंट्री आहे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. उद्या बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजी राजे आणि अन्य नेत्यांची तिसऱ्या आघाडी संदर्भात महत्त्वाची बैठक आहे. तिसऱ्या आघाडीची महाशक्ती करण्यावर या तिन्ही नेत्यांचा जोर आहे. इतरांची आघाडी आणि युती तर आमची जनतेची शक्ती राहील, असं सांगतानाच एमआयएम आणि प्रखर धार्मिकता असणाऱ्यांना आम्ही सोबत घेणार नाही. आमची लढाई धर्मापलिकडची आहे. आम्हाला एमआयएमची प्रखरता पचवणं शक्य नाही. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार आहोत, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

उमेदवारी जाहीर

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने निफाड येथे शेतकरी मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता. या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे ओबीसी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि निफाडचे माजी पंचायत समिती उपसभापती गुरुदेव कांदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत, प्रहार जनशक्तीमध्ये प्रवेश केला. यावेळी बच्चू कडू यांनी निफाड विधानसभा मतदार संघात गुरुदेव कांदे यांची तर चांदवड विधानसभा मतदारसंघात प्रहार संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली. निफाड आणि चांदवड विधानसभा मतदारसंघात आता त्रिशंकू लढत होणार आहे.

मुख्यमंत्री कमजोर नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काहीच अधिकार नाहीत. सर्व सूत्र देवेंद्र फडणवीस हलवित आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावर बच्चू कडू यांना विचारण्यात आले. असं काही चित्र नाही. एकनाथ शिंदे एवढे कमजोर नाहीत. मुख्यमंत्री म्हणून काही पॉवर असतात. ते एवढे कमोजर नाहीत. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी दाखवून दिलंय, असं बच्चू कडू म्हणाले.

ऑफर डायसवरून नाही

तुमच्या बाजूने निकाल देतो, मला मुख्यमंत्री बनवा अशी ऑफर नरहरी झिरवळ यांनी जयंत पाटील यांना दिली आहे. त्यावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बरंय ना. राष्ट्रपती आदिवासी आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष तिकडे गेले नाहीत, असं सांगतानाच झिरवळांनी ही ऑफर डायसवरून दिली नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....