AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही कसली दळभद्री जाहिरात? अजित दादा चिडले, म्हणाले, हे धंदे बंद करा, मुख्यमंत्र्यांचंही सडेतोड उत्तर, सभागृहात काय घडलं?

तो फोटो अजितदादांनी सभागृहात दाखवला. अन् ही कसली दळभद्री जाहिरात, असा सवाल केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार उत्तर दिलं.

ही कसली दळभद्री जाहिरात? अजित दादा चिडले, म्हणाले, हे धंदे बंद करा, मुख्यमंत्र्यांचंही सडेतोड उत्तर, सभागृहात काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 03, 2023 | 4:19 PM
Share

मुंबई : राज्यात एकिकडे शिंदे सरकारच्या गतिमान सरकारच्या जाहिरातीवरून सर्वत्र टीका होत आहे. तर दुसरीकडे सरकारच्या आणखी एका जाहिरातीवरून अजित दादांनी सरकारची चांगलीच कानउघडणी केली. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारने प्रकाशित केलेली एक जाहिरात दाखवली. १७ कोटीहून अधिक रक्कम शासकीय जाहिरातींसाठी खर्च झाली. पण त्यावरील एसटी बसचा फोटो काचा फुटलेला आहे. तो फोटो अजितदादांनी सभागृहात दाखवला. अन् ही कसली दळभद्री जाहिरात, असा सवाल केला. तसेच ज्या एसटी बसवर सरकारची जाहिरात आहे, त्याची किती दयनीय अवस्था आहे, हेदेखील अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार उत्तर दिलं. प्रत्युत्तरादाखल त्यांनी मविआ काळातील एका जाहिरातीचा उल्लेख केला. विधानसभेतील ही खुमासदार प्रश्न-उत्तरं आज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.

अजित दादा काय म्हणाले?

विधानसभेत अजित पवार म्हणाले, ‘ शासनाने १७ कोटीहून अधिक रक्कम महानगर पालिकेच्या जाहिरातीत खर्च केली…. अजितदादांनी सभागृहात जाहिरात वाचून दाखवली… वर्तमान सरकार, भविष्यात आकार, योजना दमदार, जनतेचे हे सरकार… आणि इतकी दळभद्री बस आहे. काचा फुटलेली.. अरे कशाला हे धंदे करतात…असा सवाल अजित पवार यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर

अजित दादांच्या जाहिरातींच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं. या आधी एकच जाहिरात होती. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढीच होती. आता माझा महाराष्ट्र, गतिमान महाराष्ट्र, असं आमचं ब्रीदवाक्य आहे.

कोट्यवधींच्या जाहिराती, बसची अवस्था दयनीय

सरकारची प्रसिद्धी करणाऱ्या जाहिराती राज्यभरातील विविध एसटी बसवर लावण्यात आल्या आहेत. मात्र एसटी बसमधील आसन व्यवस्था आणि इतर सुविधांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. यावरून जनतेतूनही सरकारवर जोरदार टीका होत आहे. राज्य सरकारच्या विविध निर्णयांची माहिती होण्यासाठी या जाहिराती बसेसवर छापण्यात आल्या आहेत. मात्र त्यातील दुरवस्था गंभीर आणि बोलकी असल्याचं चित्र आहे.

‘मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्ष नेते’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्यावरही खुमासदार टीका केली. मी तुम्हाला देशद्रोही म्हणालोच नाही. नवाब मलिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा आरोप आहे. दाऊदशी संबंधित लोकांशी त्यांनी व्यवहार केला. त्यामुळे त्यांच्यासाठी देशद्रोह शब्द वापरला. त्यांना पाठिशी घालणारे, असा आरोप मी केला. तुम्ही आम्हाला महाराष्ट्र द्रोही, घटनाबाह्य म्हणता. मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्ष नेते आहात का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.