AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांची गर्दी असेल तिथे जाऊ नका, गुप्तचर विभागाचा अलर्ट; ‘या’ दोन शहरात अजितदादांच्या जीवाला मोठा धोका

मला पाठबळ देण्यासाठी बहिणी माझ्यासभेला येत आहेत. तुमच्याशी संवाद साधता यावा म्हणून मी जन सन्मान यात्रा काढली आहे. मी दहावा अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, महिला, तरुणांचं दु:ख समजून घेतलं. आणि प्रत्येक घटकासाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. तुमची सेवा करणं हा आमचा धर्म आहे, त्यानुसार आम्ही काम करत आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

महिलांची गर्दी असेल तिथे जाऊ नका, गुप्तचर विभागाचा अलर्ट; 'या' दोन शहरात अजितदादांच्या जीवाला मोठा धोका
ajit pawar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2024 | 1:25 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अजितदादा राज्यातील विविध भागांना भेटी देत असून राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या भोवती लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, गुप्तचर विभागाने अजितदादांना या गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. अजितदादा यांच्या जीवाला धोका आहे. जिथे महिलांची गर्दी अधिक असेल तिथे जाऊ नका, अशा सूचना अजितदादांना देण्यात आल्या आहेत. खुद्द अजित पवार यांनीच याची माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा धुळ्यात आली होती. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. तेव्हा ही माहिती दिली. माझ्या जीवाला धोका असल्याबद्दल गुप्तचर विभागाने मला खबर दिली आहे. मीडियामध्ये या बातम्या आल्या आहेत. जिथे महिला असतील, गर्दी असेल तिथे जाऊ नका अशा सूचना मला मिळाल्या आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं.

या दोन शहरात धोका

मालेगाव आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला धोका होईल, असं गुप्तचर विभागाने मला सांगितलं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. राज्यातील भगिनींनी मला राख्या बांधल्या आहेत. जोपर्यंत या हातावर राख्या आहेत, तोपर्यंत मला कुणाच्या संरक्षणाची गरज नाही. माझ्या बहिणींचा आशीर्वाद, राखीचे सुरक्षा कवच आणि तुमच्या प्रेमाची ढाल यामुळे मला कोणताही धोका स्पर्श करूच शकत नाही, असं मला माझं अंतर्मन सांगतं, असं अजितदादा म्हणाले.

माय माऊलीला बळ मिळेल

आम्ही गरीब महिलांसाठी योजना आणतो आहे मात्र विरोधक विरोध करत आहेत. ते सरकारमध्ये असताना त्यांना कोणी अडवलं होतं? योजना आणताना गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी आम्ही योजना आणल्या. अनेक वेळा अर्ज भरताना समस्या आल्या, वयाची अट असेल, कागदपत्र असेल याच्या अडचणी आल्या. पण आपण त्या सोडवल्या. आता 19 तारखेला रक्षाबंधन आहे. आपण भावाच्या नात्याने आम्हाला राखी बांधता. हा भाऊ आपला आधारवड बनेल. आम्ही दिलेला शब्द पाळण्याचं काम करतो. तुम्ही जो बँकेचा अकाऊंट नंबर दिला आहे, त्यावर येत्या 17 तारखेला पैसे येतील. जी पात्र महिला आहे, तिला या योजनेचा लाभ मिळणार आहे. 17 तारखेला दीड कोटी महिलांच्या खात्यात पैसे पडणार आहेत. माझ्या माय माऊलीला बळ मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी