Sharad Pawar Birthday | पवारांच्या कोणत्या गोष्टीची अमृता फडणवीसांना भूरळ?

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रश्न विचारला असता अमृता फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. (Amruta Fadnavis On Sharad Pawar Birthday)

Sharad Pawar Birthday | पवारांच्या कोणत्या गोष्टीची अमृता फडणवीसांना भूरळ?
सचिन वाझे प्रकरणावरूनही अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते.

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत. त्यांच्याकडे ‘इम्पॉसिबल’ हा शब्दच नसतो. त्यांच्याकडे नेहमीच ‘आय एम पॉझिसिबल’ हा शब्द असतो. हेच त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली. (Amruta Fadnavis On Sharad Pawar Birthday)

अमृता फडणवीस यांनी नुकतंच दिविज फाऊंडेशनमार्फत रक्तदान केले. यावेळी त्यांना ‘टीव्ही 9 मराठी’ने शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“शरद पवार हे महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत. त्यांनी खूप महाराष्ट्रासह देशासाठी खूप काम केलं आहे. त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा. शरद पवारांकडे इम्पॉसिबल हा शब्द नसतो. त्यांच्याकडे नेहमी शब्द असतो, आय एम पॉझिसिबल. हे त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे. कितीही खाली गेलो तरी वर उसळून यायची हिंमत आणि इच्छा असायला पाहिजे. त्यासाठी वय, जात याचा काहीही संबंध नसतो,” अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

“रक्तदान करणं गरजेचे”

“महाराष्ट्राला आज सर्वात रक्ताची गरज आहे. मुंबईत सध्या केवळ सात दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा आहे. त्यामुळे ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जी लोकं फिट आहेत, त्यांनी रक्तदान करणं गरजेचे आहे,” असेही त्या म्हणाल्या.

“रक्तदान शिबीराला खूप छान प्रतिसाद आहे. अर्धा तासात 100 जणांनी रक्तदान केले आहे. यापूर्वीही अनेक रक्तदान शिबीर आयोजित केले आहेत. यापुढेही करु,” असेही अमृता फडणवीसांनी सांगितले.

विदर्भात जी काही गावं दत्तक घेतली आहेत. त्यांची काम सुरु आहेत. झाडं लावणे, रस्त्यांचे सुधारीकरण, शाळा, स्त्रियांसाठी काही आरोग्य सुविधा आहेत. यासारखी भरपूर काम सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नेहमी ट्वीटवर ट्रोल का केलं जातं?

जेव्हा एका स्त्रीचे विचार असतात. ते कधी कोणाला खटकू शकतात. तेव्हा लोकं ट्रोल करतात. त्यामुळे काही पक्षांना ते खटकले असतील तर त्यांनी मिळून मला ट्रोल केले असेल. त्यात मी काहीही मानत नाही. जसा माझा हक्क आहे ट्विट करण्याचा तसाच त्यांचा ही आहे, असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.  (Amruta Fadnavis On Sharad Pawar Birthday)

संबंधित बातम्या : 

… आणि पवारांबद्दल बोलताना मुश्रीफांना अश्रू अनावर का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या, राहुल गांधींनी दिल्या का?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI