शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का,नाशकातले दोन बडे नेते शिंदे गटात सामील

| Updated on: Sep 19, 2022 | 9:28 AM

शिंदे गटाकडून शिवसेनेला धक्क्यावर धक्के देणे सुरूच आहेत.  सध्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि नेते शिंदे गटात सामील होत आहेत. आता यामध्ये नाशिकच्या आणखी दोन नेत्यांची भर पडली आहे.

Follow us on

नाशिक :  शिंदे गटाकडून (Eknath Shinde) शिवसेनेला (Shiv sena) धक्क्यावर धक्के देणे सुरूच आहेत.  सध्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि नेते शिंदे गटात सामील होत आहेत. नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. खासदार हेमंत गोडसे आणि भाऊलाल तांबडे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. यापूर्वी देखील ठाणे, नवी मुंबई आणि इतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेला लागलेली ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापुढे असणार आहे. त्यांनी त्या दिशेने प्रयत्न देखील सुरू केले आहेत. मात्र या प्रयत्नांना अपेक्षीत असे यश येताना दिसून येत नाहीये. दुसरीकडे शिंदे गटाकडून नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना देखील सुरुवात झाली आहे.