मुंबई : विद्यापीठाच्या (University) कुलगुरू (Vice Chancellor) पदाच्या निवडीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर आता भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार टीका केलीय. विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे घेतल्यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल. एखाद्या “सचिन वाझे” सारख्या व्यक्तीला कुलगुरू करायचे आहे का? अशा व्यक्तीच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देणार का? असा खोचक सवाल शेलार यांनी केलाय.