Mohit Kambhoj: “कंबोज यांचा स्टाईक रेट 100%!, ते पुराव्यांच्या आधारेच भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडतात”, आशिष शेलारांकडून समर्थन

मोहित कंबोज यांचा स्टाईक रेट 100% आहे. ते पुराव्यांच्या आधारेच भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडतात, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी समर्थन केलं आहे.

Mohit Kambhoj: कंबोज यांचा स्टाईक रेट 100%!, ते पुराव्यांच्या आधारेच भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडतात, आशिष शेलारांकडून समर्थन
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 1:48 PM

मुंबई : सध्या मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या विधानाची जोरदार चर्चा होतेय. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला लवकरच जेलवारी करावी लागणार असल्याचं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. त्याला भाजप नेत्यांचं समर्थन मिळताना दिसत आहे. आधी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी कंबोज यांच्या बोलण्यात तथ्य असल्याचं म्हटल्यानंतर आशिष शेलार यांनीही समर्थन केलंय. मोहित कंबोज यांचं ट्विट स्वत:मध्येच अर्थपूर्ण आहे. त्यांचा स्टाईक रेट 100% आहे. पुराव्यांविना ते बोलत नाहीत. पूर्ण पुराव्यांनिशी ते बोलतात. आजपर्यंत त्यांनी पुराव्यांच्या आधारेच भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडलेत. त्यांचं ट्विट अधिक महत्वाचं आहे. कुणाला तुरुंगात टाकण्याविषयी सार्वजनिक ठिकाणी बोलणं टाळायला हवं. पण कंबोज यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी तेच केलंय, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी समर्थन केलं आहे.

‘कंबोज यांच्या बोलण्यात तथ्य’

भाजप नेते मोहित कंबोज सध्या राष्ट्रवादीवर निशाणा साधून आहेत. काल तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आजही त्यांनी दोन ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. त्यावर आता त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहित कंबोज पुराव्यांशिवाय बोलणार नाहीत. त्यांच्याकडे सबळ पुरावे असतील. त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं. भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई होणारच, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

कंबोज यांचं ट्विट

मोहित कंबोज यांनी ट्विटरच्या माध्यमातूव राष्टरवादीवर निशाणा साधलाय. “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय.”हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असंही ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची आजच चौकशी होण्याची शक्यता आहे.  त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कश्या माहिती होतात असा प्रश्न विचारला जातोय.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.