वंचितच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोर पसार

Namrata Patil

Updated on: Oct 20, 2019 | 10:20 AM

परतूर मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवाजी सवने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु (Attack on Vanchit candidate Shivaji Savane) आहेत.

वंचितच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोर पसार

जालना : परतूर मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवाजी सवने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. सवने यांच्या गाडीवर रात्रीच्या सुमारास दगडफेक झाली. या दगडफेकीत सवने हे किरोकळ जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु (Attack on Vanchit candidate Shivaji Savane) आहेत.

शिवाजी सवने हे काल बीडमधील आष्टी या गावात काही कामानिमित्त गेले होते. त्यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर रात्री 7 च्या सुमारास हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. सवने यांच्यासोबत यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष रोहन वाघमारे गाडीत होते.

या हल्ल्यादरम्यान त्या दोघांनाही गाडीच्या काचा लागल्या आणि ते किरकोळ जखमी झाले. दरम्यान या दगडफेकीनंतर हल्लाखोर तात्काळ पसार झाले. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवाजी सवने आणि वंचितचे तालुकाध्यक्ष रोहन वाघमारे यांच्यावर सध्या उपचार सुरु (Attack on Vanchit candidate Shivaji Savane) आहेत.

जालना जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीविरोधात शिवसेना-भाजप असे थेट लढतीचे चित्र आहे. जालन्यातील परतूर विधानसभा मतदारंसघातून भाजपकडून बबनराव लोणीकर रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्याविरुद्ध आघाडीने माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी उमेदवारी दिली आहे. तसेच या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे शिवाजी सवने रिंगणात उतरले आहेत.


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI