भाजप देगलूरमध्ये 20 हजारांच्या लीडनं विजयी होणार, बबनराव लोणीकरांची भविष्यवाणी, अशोक चव्हाणांवरही टीकास्त्र

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजप देगलूरमध्ये 20 हजारांच्या लीडनं विजयी होणार, बबनराव लोणीकरांची भविष्यवाणी, अशोक चव्हाणांवरही टीकास्त्र
बबनराव लोणीकर


जालना : देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, वंचितने डॉ. डॉ. उत्तमराव इंगोले यांना तिकीट दिलं आहे. नांदेडच्या देगलूर बिलोलीची निवडणूक राज्यभरात चर्चेत आहे. अशोक चव्हाण देगलूर बिलोलीत तळ ठोकून आहेत तर भाजप नेत्यांनीही प्रचारासाठी कंबर कसलीय. देगलूर विधानसभा निवडणुकीचे भाजपा प्रभारी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी अशोक चव्हाण हे रडीचा डाव खेळत आहेत, असा आरोप केलाय. चव्हाण भाजपचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप लोणीकरांनी केला आहे. मात्र, देगलूर विधानसभा भाजप 20 हजार मतांनी जिंकेल असा विश्वास लोणीकरांनी व्यक्त केला आहे.

रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळं पोटनिवडणूक

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार जितेश अंतापूरकर यांना देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे.जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सेनेचे 12 आमदार संपर्कात

शिवसेनेचे 12 आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला होता. विरोधी पक्षाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही, असं सांगताना महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात अ्सल्याचा दावा मात्र त्यांनी केला आहे. बबनराव लोणीकर नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपच्या संपर्कात महाविकास आघाडीचे आमदार असल्याचा दावा केला. तसंच आम्ही कधीही सरकार पडेल किंवा आम्ही सरकार पाडणार आहोत, असं म्हटलेलं नाही. मग सत्ताधारी वारंवार सरकार मजबूत आहे, पडणार नाही, असं का सांगत आहेत?, असा सवाल केला आहे.

कोणकोणते उमेदवार रिंगणात

जितेश रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस),
सुभाष पिराजीराव साबणे (भाजप)
उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी)
विवेक पुंडलिकराव केररकर (जनता दल (सेक्युलर))
प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी)
डी डी वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे))
अरुण कोंडीबाराव दापकेकर (अपक्ष)
साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष),
भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष),
मारुती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष),
विमल बाबुराव वाघमारे (अपक्ष),
कॉ.प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष)

इतर बातम्या:

इतर बातम्या:

देगलूर बिलोलीची जनता भाजप काँग्रेसला धूळ चारणार, वंचितचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोलेंना विश्वास

Deglur Biloli Bypoll : सेनेचा नाराज नेता भाजपचा उमेदवार, काँग्रेसचं तिकीट घरात, आता वंचितचा उमेदवार ठरला!

Babanrao Lonikar claimed BJP will win by election of Deglur Biloli with lead of 20 thousand votes

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI