AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं काँग्रेसच्या ‘पंजा’ला मतदान करण्याचं आवाहन!

मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावेळी शिंदे यांनी चुकून ३ तारखेला काँग्रेसच्या पंजाला मतदान करण्याचं आवाहन केलं. काँग्रेसनं शिंदे यांचा हा व्हिडीओ शेअर करत 'सिंधिया जी, मध्य प्रदेशची जनता विश्वास देते आहे, की 3 तारखेला हाताच्या पंजाचंच बटन दाबलं जाईल', असा जोरदार टोला लगावला आहे.

...आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं काँग्रेसच्या 'पंजा'ला मतदान करण्याचं आवाहन!
| Updated on: Nov 01, 2020 | 1:23 PM
Share

भोपाळ: मध्यप्रदेशातील विधानसभेच्या 28 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावलाय. भाजपकडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे जोरदार प्रचार करत आहेत. मात्र, एका जाहीर सभेत मतदारांना मतदानासाठी आवाहन करताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क काँग्रेसच्या ‘पंजा’ला मतदान करण्याचं आवाहन केलं! यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजप उमेदवार ज्योतिरादित्य यांच्याकडे पाहतच राहिले. (By mistake Jyotiraditya Shinde’s appeal to vote for Congress candidate)

मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कमलनाथ यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानं चर्चेत आलेल्या भाजप उमेदवार इमरती देवी यांच्या प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदे डबरामध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी शिंदे यांनी चुकून ३ तारखेला काँग्रेसच्या पंजाला मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र, आपली चूक लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी चिभ चावली आणि भाजपच्या कमळाला मतदान करण्याचं आवाहन केलं.

“शिवराज सिंह आणि आम्हाला विश्वास द्या, माझी शानदार आणि जानदार डबराची जनता… ३ नोव्हेंबरला हाताच्या पंजाचं बटन दाबलं जाईल,” असं आवाहन शिंदे यांनी केलं. त्यानंतर लगेच आपली चूक लक्षात आल्यावर शिंदे यांनी जीभ चावली आणि कमळाचे फूल असलेलं बटन दाबणार आणि हाताच्या पंजाला डाबरामधून रवाना करणार,” असं म्हणत सावरण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसकडून ज्योतिरादित्य शिंदे यांना जोरदार टोला

काँग्रेसनं शिंदे यांचा हा व्हिडीओ शेअर करत ‘सिंधिया जी, मध्य प्रदेशची जनता विश्वास देते आहे, की 3 तारखेला हाताच्या पंजाचंच बटन दाबलं जाईल’, असा जोरदार टोला लगावला आहे.

प्रशांत भूषण यांच्याकडूनही शिंदेंना टोला

तर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी हा व्हिडीओ शेअर करत, ‘आपण नक्की कोणत्या पक्षात आहोत, याबद्दल आपले छोटे महाराज थोडेसे गोंधळलेले आहेत’, असा चिमटा काढला आहे.

संबंधित बातम्या:

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत मोठा ‘घोडेबाजार’?, काँग्रेस आमदाराला ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर गंभीर आरोप

निवडणूक आयोगाचा मध्यप्रदेशातील भाजप मंत्र्यांना दणका, एका मंत्र्यावर प्रचारबंदीची कारवाई तर दुसऱ्याला नोटीस

आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन; ‘स्टार प्रचारक’पद काढलं; काँग्रेस नेते कमलनाथ यांना निवडणूक आयोगाचा झटका

By mistake Jyotiraditya Shinde’s appeal to vote for Congress candidate

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...