AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Municipal Election Date 2025: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली, निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती

Maharashtra Municipal Election, BMC Poll Date 2025 News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत असं राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

Maharashtra Municipal Election Date 2025: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली, निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती
Election-polling
| Updated on: Aug 05, 2025 | 7:14 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट मशीन वापरली जाणार नाही, निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार आहेत अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.

राज्य निवडणूक आयोग मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विभागीय बैठक घेण्यात आली. यात नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. यात या निवडणूका दिवाळीनंतर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सोमवारी नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली होती. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता आगानी निवडणूका नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह घोण्यास मंजुरी मिळाली आहे.

राज्यातील महत्त्वाच्या माहापालिका नाशिक महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, मुंबई महापालिका यांच्या प्रभाग रचनेमध्ये काही बदल करण्यात आले होते. मात्र नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या काही याचिका कोर्टात सादर करण्यात आल्या होत्या, त्यामुळे आता राज्यात नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुका पार पडणार आहेत.

मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार

मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.

मुंबईमध्ये आधीही 227 प्रभाग होते. महाविकास आघाडीचे सरकारआल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन 236 प्रभाग करण्यात आले होते. पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 227 प्रभाग करण्यात आले. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परतू ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मुंबईमध्ये आता 227 प्रभाग असणार आहेत.

या महानगरपालीकांसाठी चार सदस्यीय प्रभाग

अ, ब आणि क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी झाले आहेत.

  • ‘अ’ वर्ग महानगरपालिका – पुणे, नागपूर
  • ‘ब’ वर्ग महानगरपालिका – ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड,
  • ‘क’ वर्ग महानगरपालिका नवीमुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजी नगर , कल्याण-डोंबिवली.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.