AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election 2025 Result : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचा डंका, निवडणुकीचा निकाल काही मिनिटांवर!

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांत लागणार आहे. ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीसाठी सत्तधारी आणि विरोधकांनी पूर्ण ताकदीने प्रचार केला होता.

Bihar Election 2025 Result : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचा डंका, निवडणुकीचा निकाल काही मिनिटांवर!
bihar state assembly election result
| Updated on: Nov 14, 2025 | 7:25 AM
Share

Bihar Vidhan Sabha Election 2025 Result  गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी एनडीए तसेच महागठबंधनने पूर्ण ताकद लावली होती. याच निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया 11 नोव्हेंबर रोजी पार पडली. मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलचेही आकडेही जाहीर केले. या एक्झिट पोलच्या आकड्यांत नेमके कोणाचे सरकार येणार? याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून सर्वांनीच भाजपा आणि नितीश कुमार यांच्या एनडीएचे पारडे जर भरणार, असा अंदाज व्यक्त केला आहे. असे असतानाच आता अवघ्या काही तासांत बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे आता राजकाणातील हे युद्ध नेमके कोण जिंकणार? हे लवकच स्पष्ट होणार आहे?

दोन टप्प्यांत झाली होती निवडणूक

बिहार विधानसभा निवडणूक एकूण दोन टप्प्यांत झाली. एकूण 243 जागांसाठी  ही निविडणूक आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या एकूण 121 तर दुसऱ्या टप्प्यात एकूण 122 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. पहिल्या टप्प्याचे मतदान 6 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी पार पडले. आता 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे.

नेमकी कोणाकोणात लढत झाली?

बिहारची विधानसभा निवडणूक यावेळी विशेष होती. एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी ही सरळ निवडणूक होती. परंतु राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीदेखील या निवडणुकीत उडी घेत अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे त्यांनी केलेला आक्रमक प्रचार आणि नितीश कुमार यांच्यावर केलेला हल्लाबोल यामुळे बिहारमधील राजकारण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे यावेळी नेमकं कोण बाजी मारणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. भाजपा, नितीश कुमार यांचा जदयू या दोन प्रमुख पक्षांसह इतरही काही मित्रपक्षांनी एनडीए म्हणून निवडणूक लढवली तर महागठबंधनमध्ये काँग्रेस, तेजस्वी यादव यांच्या आरजेडी या प्रमुख पक्षांनी निवडणुकीचे मैदान गाजवले. त्यामुळे आता नेमकं कोण बाजी मारणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

एक्झिट पोलच्या आकड्यात यावेळीही बिहारमध्ये एनडीएचीच सत्ता येईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एनडीएच्या काही जागा वाढण्याचाही अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय. काही एक्झिट पोलमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू तर काही एक्झिट पोलमध्ये अखिलेश यादव यांचा आरजेडी सर्वात जास्त जागा जिंकणार असे भाकित व्यक्त करण्यात आले आहे.  दरम्यान, पुढच्याच काही तासांत निकाल स्पष्ट होणार असून येथे कोण सर्वात मोठा पक्ष ठरला? कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार? हे स्पष्ट होणार आहे.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.