सामनाचा अग्रलेख म्हणजे ‘खाली डोकं वर पाय’; आशिष शेलारांची खरमरीत टीका

त्यामुळे दुजाभावाचं राजकारण शिवसेना करत आहे, अशी खरमरीत टीका आशिष शेलारांनी केली आहे. (BJP Ashish Shelar Criticizes Saamana Editorial)

सामनाचा अग्रलेख म्हणजे 'खाली डोकं वर पाय'; आशिष शेलारांची खरमरीत टीका
भाजप नेते आशिष शेलार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 3:16 PM

मुंबई : “आजच्या सामना अग्रलेखाला खाली डोकं वर पाय असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे सर्वात जास्त का आहे? मृत्यूची संख्या सर्वात जास्त का आहे? मग याच पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घ्यायचं नाही का?” असा खोचक सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. (BJP Ashish Shelar Criticizes Shivsena Saamana Editorial)

“दुजाभावाचं राजकारण शिवसेना करतेय”

मुख्यंत्री उद्धव ठाकरे रोज केंद्रापुढे हात जोडत आहे. लस द्या, जीएसटीचा पैसा द्या, आम्हाला एअरफोर्सची सुविधा द्या, 18 वर्षांवरील लसीकरणाची परवानगी द्या, या सर्व गोष्टी केंद्र सरकार पुरवत आहे. तरीही केंद्राला दोष द्यायचा. त्यामुळे दुजाभावाचं राजकारण शिवसेना करत आहे, अशी खरमरीत टीका आशिष शेलारांनी केली आहे.

“जनतेच्याच रोषाला सामोरं जायला तयार राहावं” 

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्षांचा नालेसफाईचा दौरा म्हणजे आंधळी कोशिंबीरचा खेळ आहे. कारण ‘तेरी भी चूप मेरी भी चूप. आम्ही दावा करू शकत नाही की पाणी तुंबणार नाही असं म्हणून पळ काढता येणार नाही. जनतेला सुविधा द्यायला हव्यात आणि जर त्या दिल्या नाहीत तर किंबहुना, किंबहुना ते असे म्हणतात म्हणून जनतेच्याच रोषाला सामोरं जायला तयार राहावं, असेही शेलार म्हणाले.

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय? 

कोरोनाचा परिपूर्ण अभ्यास आणि त्यानुसार प्रभावी उपायांची काटेकोर अंमलबजावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी महाराष्ट्र करीत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांचा आधार वाटतो, हे दिलासादायक आहे. मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’च झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्राला धोक्याची पातळी ओलांडू दिली नाही. लोकांना हिंमत देण्याचे व संकटाशी लढण्याचे आत्मबळ देण्याचे काम फॅमिली डॉक्टर बनून मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत. त्यांचे हात मजबूत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे, असा सल्ला शिवसेनेनं अप्रत्यक्षरित्या विरोधकांना दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टरांबरोबरच हजारभर ‘फॅमिली डॉक्टरां’शी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले की, ‘आतापासूनच लहान मुलांवर लक्ष द्या. मुलांमध्ये आढळणारे जे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, ताप, खोकला, डायरिया, दूध न पिणे, भूक न लागणे या लक्षणांकडे खास लक्ष द्या,’ अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. हे एका कुटुंबप्रमुखाचेच लक्षण आहे, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंची पाठ थोपाटण्यात आली आहे.(BJP Ashish Shelar Criticizes Shivsena Saamana Editorial)

संबंधित बातम्या : 
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.