दुसऱ्या यादीतही खडसेंचं नाव नाही, भाजपकडून 14 उमेदवार जाहीर

या यादीत बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत एकूण 14 नावांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत 125 जणांना उमेदवारी जाहीर (BJP Candidate second List) केली होती.

दुसऱ्या यादीतही खडसेंचं नाव नाही, भाजपकडून 14 उमेदवार जाहीर
सचिन पाटील

| Edited By:

Oct 02, 2019 | 10:25 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपने (BJP Candidate second List) दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या यादीतही पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव जाहीर झालेलं नाही. या यादीत बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत एकूण 14 नावांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत 125 जणांना उमेदवारी जाहीर (BJP Candidate second List) केली होती.

यंदा महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly election 2019) निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) ठरला आहे. भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला भाजपच्या कोट्यातून 2 विधानपरिषदेच्या जागाही सोडण्यात येणार आहेत.

भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 122 जागा जिंकत, सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र यंदा भाजपची शिवसेनेसोबत युती आहे. युती करताना दोन्ही पक्ष सम-समान जागा लढवण्याचं ठरलं होतं. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने 63 जागी विजय मिळवला होता.

भाजपची दुसरी यादी

मोहन गोकुळ सुर्यवंशी – साक्री

प्रतापदादा अरुणभाऊ अडसाद – धामणगाव रेल्वे

रमेश मावस्कर – मेळघाट

गोपाळदास अग्रवाल – गोंदिया

अमरिशराजे आत्रम – अहेरी

निलय नाईक – पुसद

नामदेव ससाणे – उमरेड

दिलीप बोरसे – बागलन

कुमार उत्तमचंद ऐलानी – उल्हासनगर

गोपीचंद पडळकर – बारामती

संजय (बाळा) भेगडे – मावळ

नमिता मुंदडा – केज

शैलेश लाहोटी – लातूर (शहर)

अनिल कांबळे – उदगीर

भाजपची पहिली यादी पाहण्यासाठी क्लिक करा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें