खडसेंना भेटण्यासाठी भाजपच्या नेत्यांना वेळच नाही, दिल्लीत एकटे शरद पवारच भेटले!

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (9 डिसेंबर) भेट घेतली. उद्या (10 डिसेंबर) एकनाथ खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

खडसेंना भेटण्यासाठी भाजपच्या नेत्यांना वेळच नाही, दिल्लीत एकटे शरद पवारच भेटले!

नवी दिल्ली : भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर जाहीर नाराजी व्यक्त करत (Eknath khadse meet sharad pawar) आहेत. एकनाथ खडसे यांनी आज (9 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीत निवासस्थानी खडसे-पवारांमध्ये भेट (Eknath khadse meet sharad pawar) झाली. यावेळी त्यांनी एकमेकांशी अर्धा तास चर्चा झाली. यानंतर उद्या (10 डिसेंबर) एकनाथ खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार  (Eknath khadse meet sharad pawar) आहेत.

एकनाथ खडसे हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिली नाही. दिल्लीत महाराष्ट्राचे प्रभारी भुपेंद्र यादव यांच्याकडे एकनाथ खडसेंनी वेळ मागितली होती. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ खडसे यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच त्यांना भेटण्यासाठी वेळ नसल्याचेही सांगण्यात आले.

यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेऊन एअरपोर्टवर रवाना होत असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आमच्या मतदारसंघातील पाण्याची योजना जल आयोगाकडे रखडली होती. आज जल आयोगाने त्याला मान्यता दिली. पण केंद्र सरकारकडून अद्याप त्या योजनेला मान्यता मिळालेली नाही. यासाठी शरद पवारांची भेट घेतली. जवळपास 12 मिनिटे आम्ही चर्चा करत (Eknath khadse meet sharad pawar) होतो.” असे ते म्हणाले.

“शरद पवारांनी मला मुलगी रोहिणी खडसेंचा पराभव कसा झाला हे विचारले. त्यांनी मी त्याबाबतची माहिती दिली.” असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले. याच पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

तसेच भुपेंद्र यादव यांच्याशी फोनवर बोलणं झालं. त्यांनीही हा विषय समोर नेण्याचं वचन दिले. तसेच अनेक नेते संसदेत व्यस्त असल्याने ही भेट झाली नाही. असे खडसेंनी स्पष्ट केले.

एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहे. त्यांनी अनेकदा ही नाराजी पत्रकारांसमोर मांडली आहे. मात्र मी पक्ष सोडणार नाही असेही त्यांनी अनेकदा स्पष्ट केले (Eknath khadse meet sharad pawar) आहे.

संबंधित बातम्या : 

…तर मला वेगळा विचार करावा लागेल : एकनाथ खडसे

दाऊदच्या बायकोशी संबंध जोडले, मंत्रिमंडळातून काढलं, तिकीट नाकारलं, रोहिणीला पाडलं : खडसेंचे हल्ले सुरुच

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI