AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: 12 आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत, काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात, भाजपच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

शिवसेनेचे 12 आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. विरोधी पक्षाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही, असं सांगताना महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात अ्सल्याचा दावा मात्र त्यांनी केला आहे.

Video: 12 आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत, काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात, भाजपच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट
बबनराव लोणीकर, भाजपचे माजी मंत्री
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 1:31 PM
Share

नांदेड : शिवसेनेचे 12 आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. विरोधी पक्षाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही, असं सांगताना महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात अ्सल्याचा दावा मात्र त्यांनी केला आहे.

सेनेचेच नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीचेही आमदार आमच्या संपर्कात

बबनराव लोणीकर नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपच्या संपर्कात महाविकास आघाडीचे आमदार असल्याचा दावा केला. तसंच आम्ही कधीही सरकार पडेल किंवा आम्ही सरकार पाडणार आहोत, असं म्हटलेलं नाही. मग सत्ताधारी वारंवार सरकार मजबूत आहे, पडणार नाही, असं का सांगत आहेत?, असा सवाल केला आहे.

12 आमदार शिवसेना सोडण्याचा तयारीत!

शिवसेनेचे 12 आमदार पक्षात नाराज आहेत. त्याची काही उदाहरणं द्यायची म्हटली तर सुभाष साबणे, प्रताप सरनाईक अशी देता येतील. खूप लोकांना खूप काही बोलायचं आहे. पण त्यांना बोलता येत नाही. असेच सेनेचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही आमदार आमच्या संपर्कात आहे. सरकारच्या पापाच्या घडा भरलाय. लवकरच तो फुटणार आहे, असा इशाराही त्यांना दिला.

शिवसेनेत मोठी खदखद

“हे सरकार 100 पैकी 100 टक्के नापास आहे. भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते वारंवार करतात. पण सेनेचे 12 आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना पक्षात फार मोठी खदखद आहे. नाराज सेना आमदारांना न्याय मिळत नाही. त्यांच्या मतदारसंघात त्यांना विकासासाठी निधी मिळत नाही आणि विकास होत नाही”, असं लोणीकर म्हणाले.

हे ही वाचा :

‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही’, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना टोला

VIDEO: राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार, कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यांच्या भेटीनंतर निर्णय

Follow Us
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार.
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....