AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालवणचो खाजो भी आमचो आणि जलेबी-फापडा भी आपडो; शिवसेनेला उत्तर देण्यासाठी आशिष शेलार मैदानात

'कोकण म्हणजे आम्हीच', असा अहंकार असणाऱ्या पक्षाचे वस्त्रहरण सुरु झाल्याचे त्यांनी म्हटले. | Ashish Shelar

मालवणचो खाजो भी आमचो आणि जलेबी-फापडा भी आपडो; शिवसेनेला उत्तर देण्यासाठी आशिष शेलार मैदानात
भाजप नेते आशिष शेलार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Jan 06, 2021 | 12:34 PM
Share

मुंबई: मुंबई महानगरापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी गुजराती मतदारांना साद घालणाऱ्या शिवसेनेला (Shivsena) भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य तर रत्नागिरीत 121असे एकुण भाजपाचे 2 ग्रामपंचायतीसह 182 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणातील मतदारांना गृहीत धरण्याच्या शिवसेनेच्या वृत्तीवर ताशेरे ओढले. ‘कोकण म्हणजे आम्हीच’, असा अहंकार असणाऱ्या पक्षाचे वस्त्रहरण सुरु झाल्याचे त्यांनी म्हटले. (BJP leader Ashish Shelar slams Shivsena over Gujarati Melava in Mumbai)

यावेळी शेलार यांनी शिवसेनेच्या ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या नव्या टॅगलाईनविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर आशिष शेलार यांनी, मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो’, अशी टिप्पणी केली.

‘सकाळ-संध्याकाळ लाथाबुक्क्या खाणे हेच काँग्रेसचे काम’

महाविकासआघाडी सरकारमध्ये सकाळ-संध्याकाळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून लाथाबुक्क्या खाणे एवढेच काम आता काँग्रेसला उरले आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेस पक्षाचे विघटन होण्याचा धोका आहे. आता हे विघटन शिवसेनेमुळे होतंय का, याकडे काँग्रेसने लक्ष द्यावे, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपचे 12 प्रमुख नेते मिशनवर

राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपचे 12 नेते राज्यभरात दौरे करणार आहेत. भाजपच्या मंगळवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही महाविकासआघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ. रोज सरकार पडणार म्हणून ओरडायचे आणि फोडाफोडी करायची, हे दुबळ्यांचे राजकारण आहे. तरीही नवी मुंबईत भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा शेलार यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

माणूस अनुभवाने शिकतो, शिवसेनेच्या जिलेबी फापडा, उद्धव ठाकरे आपडावर काँग्रेसची प्रतिक्रिया

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

“आता गुजराती भाषिकांचा मेळावा, भविष्यात मुस्लिमांचाही मेळावा घेतील, बिचाऱ्या शिवसेनेवर संगतीचा परिणाम”, दानवेंचा टोमणा

(BJP leader Ashish Shelar slams Shivsena over Gujarati Melava in Mumbai)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.